संपादकीय भाग ४ -ज्यांनी स्मृती जपल्या – त्यांचं आपण काय केलं?

छावा, संपादकीय | दि. २० जुलै (सचिन मयेकर)
रामदास बोट दुर्घटनेनंतर स्मारक, शासन आणि समाजाच्या प्रतिक्रियेचा लेखाजोखा
मृत्यू लाटांमध्ये, स्मृती किनाऱ्यावर…
१७ जुलै १९४७ रोजी समुद्रात बुडालेल्या ‘रामदास’ बोटीतून सुमारे ७०० हून अधिक जण कधीच परतले नाहीत.
मात्र, त्यांची नावे परत आली – आठवणीतून, स्वप्नांतून, आणि कुठल्यातरी कोपऱ्यातल्या घरगुती देवघरातून.
आज ७८ वर्षांनंतरही, ती घटना काही घरांमध्ये गुपितसारखी आणि काहींच्या काळजात जखमेसारखी जपली जाते.
स्मारकं का नाही उभी राहिली?
कोकणात जिथे-जिथे ‘रामदास’च्या प्रवाशांचे घर होते
तिथे अजूनही या दुर्घटनेची आठवण फक्त माणसांच्या तोंडात आणि मनात आहे. पण…
शासकीय पातळीवर ‘रामदास’ दुर्घटनेचं कोणतंही कायमस्वरूपी स्मारक नाही.
ना कोकण रेल्वेच्या स्टेशन्सवर शिलालेख
ना कोठल्याही बंदरावर ओळखचिन्ह
ना शिक्षण व्यवस्थेत याविषयी उल्लेख
ना १७ जुलैला राजकीय प्रतिनिधींकडून साधा श्रद्धांजली कार्यक्रम
शासनाची भूमिका: फाईलमध्ये अडकलेलं दुःख
दुर्घटनानंतर काही दिवस मुंबई सरकार आणि बोटमालकांवर गुन्हे नोंदवले गेले,
पण कोणतीही शिक्षा किंवा जबाबदारी निश्चित झाली नाही.
मृतांच्या कुटुंबियांना नाही नुकसानभरपाई, नाही कोणतीच मदत.
तेव्हा देश स्वतंत्र नव्हता…हाच एकमेव कारण दिलं जातं.
परंतु, त्यानंतर ७८ वर्षांत तरी कोणाला आठवण झाली का?एकाही सरकारने ‘रामदास’ दुर्घटनेला राष्ट्रीय आपत्ती म्हणून मान्यता दिली नाही.
समाजाचं स्मरण, तरीही शांती नाही
काही गावांत १७ जुलै रोजी दीप लावले जातात, बोटीच्या दिशेने डोळे लावले जातात.
काहींनी मुलांचं नाव ‘रामदास’ ठेवलं – त्या क्षणांची आठवण म्हणून.
काही घरांत अजूनही जुने बूट, ओढणी, फोटो ठेवलेले आहेत – जणू त्या व्यक्ती कधीही परत येतील.
हे स्मरण केवळ श्रद्धेचं नव्हे – तर एक जिवंत संवाद आहे मृतांशी.
मागणी – आता तरी काही घडेल का?जर ही घटना अमेरिकेत घडली असती, तर एक भव्य मेमोरियल, फिल्म, आणि शैक्षणिक अभ्यासक्रम तयार झाला असता.”
– एका साक्षीदाराचं वाक्य
आज या दुर्घटनेच्या निमित्ताने खालील गोष्टी गरजेच्या आहेत:
रेवदंडा / अलिबाग / मुंबई बंदरावर ‘रामदास’ स्मृती शिल्पस्थळ
दुर्घटनेतील मृतांची नावांची शासकीय यादी व सन्मान
कोकणात शालेय इतिहासात ‘रामदास’चा समावेश
बचावलेल्यांची सन्मानसूची व त्यांच्या अनुभवांचे संकलन
‘रामदास’ दुर्घटना ही केवळ एक गुढ घटना नव्हे.
ती कोकणाच्या मातीतील खोल इतिहास आहे – जो अजूनही सांगायचा राहिलाय.
ही दुर्घटना विसरणं म्हणजे त्या प्रत्येक हाकेला दुर्लक्ष करणं – जी समुद्रात गडप झाली होती.
आजच्या पिढीने हे सांगायचं आहे –
“आम्ही केवळ मृतांना नव्हे, तर आठवणींनाही न्याय देणार.”
रामदास बोट दुर्घटनेवर आधारित ही चार भागांची लेखमालिका येथे पूर्ण होते.
ही एक दुर्घटना नव्हती — तर काळजाला चिरणारी, अनेक पिढ्यांच्या मनात घर करणारी एक शोकात्म कहाणी होती.
आमचा उद्देश होता — केवळ माहिती सांगणे नव्हे, तर त्या दिवशी हरवलेल्या चेहऱ्यांची आठवण पुन्हा जागवणे, वाचलेल्यांची धडपड मांडणे, आणि भविष्यासाठी काही शिकण्याची प्रेरणा देणे.
आज ७८ वर्षांनंतरही त्या बोटीत बुडालेल्या अश्रूंनी आपल्या जमिनीलाही ओली केलं आहे.
आम्ही कृतज्ञ आहोत — ज्यांनी आठवणी दिल्या, फोटो जपले, नावं सांगितली, आणि ही मालिका पूर्ण होण्यासाठी पाठबळ दिलं.
लेखमालिका संपली — पण स्मृतींचा किनारा अजून ओला आहे.
आपण वाचक होतात, साक्षीदार झालात — आता कदाचित वाहकही व्हाल, हीच अपेक्षा.?
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.