” सिंगम लेडी ” आंचल दलाल यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी gps मशीन व सिग्नल शोध मोहीम यशस्वी!

छावा दि.१२ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर)
पाकिस्तानी Gps मशीन व सिग्नल सापडले
रायगड जिल्हा – कोस्टगार्डच्या रडार प्रणालीवर आलेल्या सिग्नलनंतर रायगड जिल्ह्यातील कोर्लई किल्ला परिसरात सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली होती. या सिग्नलचा उगम “मुकद्दर 99” नावाच्या एका बोया वरून झाला असून, त्याचे लोकेशन थेट पाकिस्तानशी संबंधित असल्याचा संशय होता.
या पार्श्वभूमीवर मा. जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल (Lady Singham) यांच्या नेतृत्वाखाली, रेवदंडा पोलीस ठाण्याचे सपोनि श्री किरवले, हेड कॉन्स्टेबल मनीष ठाकूर, महेंद्र राठोड, गव्हाणे, महिला पोलिस हवालदार ठाकूर, महिला पोलिस हवालदार म्हात्रे, तसेच BDDS (बॉम्ब शोधक आणि नाशक पथक) व सागर रक्षक दल, रेवदंडा यांनी संयुक्तरित्या शोधमोहीम राबवली.
या तीव्र आणि अचूक तपासणीमुळे संशयित बोया वरील gps मशीन थेरोंडा बाजारपाडा जवळील समुद्रकिनारी सापडली असून, सुरक्षेच्या दृष्टीने त्याची कसून चौकशी व तपास सुरु आहे. या मोहिमेमुळे रायगड पोलिसांच्या कार्यक्षमतेचा व सजगतेचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे.
देशाच्या सागरी सुरक्षेसाठी चालवलेल्या या कारवाईचे सर्वच स्तरांवर कौतुक होत आहे. विशेषतः महिला IPS अधिकारी म्हणून आंचल दलाल यांच्या कार्यशैलीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.