संपादकीय- अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या गुरूंच्या चरणी नतमस्तक ..व्यास पौर्णिमेच्या निमित्ताने गुरूप्रती कृतज्ञतेचा भाव

छावा, संपादकीय | दि. १० जुलै(सचिन मयेकर)

भारतीय संस्कृतीत गुरुशिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या परंपरेचा गौरव करणारा दिवस म्हणजे व्यास पौर्णिमा. आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी हा दिवस साजरा केला जातो. यालाच गुरुपौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी महर्षी वेदव्यासांचा जन्म झाल्याचे मानले जाते, म्हणून त्यांना वंदन करण्याचा आणि आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा विशेष दिवस आहे.

महर्षी व्यास हे वेदांचे संकलक, महाभारताचे रचनाकार, आणि पुराणांचे लेखक होते. त्यांच्या ज्ञानामुळेच त्यांना जगद्गुरू म्हणण्यात येते. त्यांनी वेदांचे चार भागात विभागून ज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहचवले. त्यांच्या अमूल्य कार्यामुळेच आजपर्यंतही भारतात ज्ञानाचा दीप प्रज्वलित राहिला आहे.

व्यास पौर्णिमेच्या दिवशी विविध शैक्षणिक संस्था, मंदिरं व समाजिक ठिकाणी गुरूंचा सन्मान केला जातो. शिष्य आपल्या गुरूंना वंदन करून, पुष्प, वस्त्र, व आभारांद्वारे आपली निष्ठा व्यक्त करतात.

आजच्या युगातही गुरूंचं महत्त्व तितकंच आहे. शिक्षक, पालक, मार्गदर्शक, ज्यांच्यामुळे आपण योग्य दिशा शोधतो – त्यांना वंदन करणे ही आपल्या संस्कृतीची शिकवण आहे.

या पवित्र दिवशी आपण सर्वांनी आपल्या गुरूंना स्मरून त्यांच्या चरणी नतमस्तक व्हावं, हेच व्यास पौर्णिमेचं खरे सार आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *