रेवदंडा पारनाका येथे भरधाव नेक्सॉनची धडक – दोन गाड्यांचे मोठे नुकसान

छावा रेवदंडा | ९ जुलै २०२५ (सचिन मयेकर)

मुरुडहून अलिबागच्या दिशेने भरधाव वेगात निघालेली नेक्सॉन (MH06-CD-8879) ही चारचाकी गाडी चालकाचा ताबा सुटल्यामुळे थेट रेवदंडा पारनाका येथील नागावकर यांच्या घराखाली असलेल्या भाजी मंडईवर जाऊन आदळली. धडक इतकी जबरदस्त होती की गाडी मागच्या बाजूने जोरात ग्रामपंचायतीचे दिशेने जाऊन दुकान गाळ्यावर आदळली.या अपघातात ग्रामपंचायतीच्या झेंडावंदनासाठी लावलेले लोखंडी पाईप तुटले, तसेच ग्रामपंचायतीच्या खाली असणाऱ्या दुकान गाळ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.


दरम्यान, याच मार्गावरून अलिबागकडून मुरुडकडे येणारी इर्टीगा (MH04-HX-1086) गाडी जात होती. भरधाव नेक्सॉनने या इर्टीगाला जोरदार धडक दिली. त्यामुळे इर्टीगा गाडीचेही मोठे नुकसान झाले असून तिचाही काही काळ ताबा सुटल्याची माहिती आहे.
हा अपघात रात्री अंदाजे दीड वाजण्याच्या सुमारास घडला. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघातानंतर परिसरात घबराट पसरली होती आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य हाती घेतले.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *