आषाढी एकादशी निमित्त अलिबागमध्ये विठ्ठल रखुमाई मंदिरात धार्मिक उत्सव; पालखी सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

छावा दि.०६ जून अलिबाग (सचिन मयेकर)
आषाढी एकादशीच्या निमित्ताने अलिबाग येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ असलेल्या श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पहावयास मिळाली.
संध्याकाळी मंदिरातून श्री विठ्ठल रखुमाई यांची पालखी शहरातून मिरवणुकीने काढण्यात आली. टाळ, मृदंग, भजन आणि गजरात पारंपरिक पद्धतीने झालेला हा पालखी सोहळा संपूर्ण अलिबाग शहरात फिरवण्यात आला. “विठू माऊली… माऊली विठू” च्या जयघोषात शहराचा प्रत्येक कोपरा भक्तिरसात न्हालेला दिसून आला.
भाविकांच्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात झालेला हा सोहळा आषाढी एकादशीच्या निमित्ताने विशेष आकर्षण ठरला.