जैविक निविष्ठांची निर्मिती व वापर करण्याचे कृषि विभागाचे आवाहन
छावा, दि.०९ | बुलडाणा | वृत्तसंस्था |
खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त जैविक निविष्ठा बनवून त्याचा वापर पिकासाठी करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले.
राज्य पुरुस्कृत कापूस व सोयाबीन मूल्यसाखळी वाढ विकास योजनेंअंतर्गत बांधावर जैविक लॅब प्रयोगशाळा उभारण्यात आले आहेत. खरीप हंगाम सन 2025-26 च्या दृष्टीने क्षेत्रीय स्तरावर जैविक लॅबमार्फत सोयाबीन, तूर, उडीद, मुंग, अशा विविध पिकांना ट्रायकोड्रामा, विविध जैविक सप्तधान्य स्लरी, गांडूळखत, ग्रॅन्यूअल खत, हुमिक अँसिड दशपर्णीअर्क यासारख्या निविष्ठा तयार केल्या जातात. आजच्या शेती पद्धतीत बहुतांश शेती रासायनिक पद्धतीने सुरु आहे. नैसर्गिक किंवा जैविक सेंद्रिय निविष्ठाचा वापर निर्यातक्षम पिकापूरता मर्यादित आहे. त्यामुळे रासायनिक निविष्ठाचा वापर कमी करून नैसर्गिक निविष्ठाची वापर करणे काळाची गरज आहे. शेतातील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी, मातीची सुपीकता जपण्यासाठी रासायनिक निविष्ठाचा वापर कमी करून जैविक सेंद्रिय शेतीवर भर देणे आवश्यक आहे. त्यामुळे उत्पादन व गुणवत्तेत वाढ होवून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. तरी शेतकऱ्यांनी जैविक निविष्ठाची निर्मिती करुन त्यांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आला आहे.
0000