रेवदंड्यात महावीर जयंती उत्साहात भक्तिभावाला उधाण
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर, रेवदंडा मंगळवार ३१ मार्च २०२६
रेवदंडा (ता. अलिबाग) येथे भगवान महावीर जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. बाजारपेठेतील जैन समाजाच्या मंदिरापासून वाजतगाजत भगवान महावीर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीत जैन समाजातील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात तसेच धार्मिक घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला.
मंदिरात यानिमित्त भगवान महावीर यांची विधिवत पूजा, अभिषेक आणि आरती करण्यात आली. तसेच सामूहिक प्रार्थना आणि भक्तिगीतांनी वातावरण अधिकच मंगलमय झाले.
या कार्यक्रमामुळे रेवदंड्यात भक्तीभावाला अक्षरशः उधाण आले होते.

![]()

