नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला रेवदंड्यास धक्का साळाव पुलाखाली अज्ञात वृद्ध महिलेचा मृतदेह
- छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल
- ✍️ सचिन मयेकर
- 📅 बुधवार , 3१ डिसेंबर २५
रेवदंडा पोलीस स्टेशन हद्दीतील साळाव पुलाखाली आज संध्याकाळी साधारण पाचच्या सुमारास एका अज्ञात वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे, माहिती मिळताच रेवदंडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा कार्यवाही सुरू केली आहे, मात्र सदर महिलेची ओळख अद्याप पटलेली नसल्याने पोलिसांकडून नागरिकांना मदतीचे आवाहन करण्यात आले आहे, कोणाला या महिलेबद्दल काही माहिती, ओळख किंवा नातेवाईक संदर्भ माहिती असल्यास त्यांनी विलंब न करता रेवदंडा पोलीस ठाणेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले असून अधिक माहितीसाठी गव्हाणे पोलीस – मो. 9922947751या क्रमांकावर संपर्क करण्यास सांगितले आहे.
![]()


