स्थिर रूपांपेक्षा चालती-फिरती आराधना — खऱ्या जिवंत देवींची कथा देवालयातील आरतीपेक्षा त्या रोजच्या निस्वार्थ सेवेला सलाम.
सूचना : हा लेख “खरी जिवंत देवी!” हा फक्त स्त्रीशक्तीचा गौरव करण्यासाठी आहे. येथे घेतलेली नावे केवळ उदाहरणादाखल असून, समाजातील सर्वच स्त्रिया देवीच्या रूपात वंदनीय आहेत. कोणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा हेतू नाही.
तूच आमच्या लेकरांची सरस्वती,तूच आमच्या गावाची खरी विद्या,तूच जीवदान देणारी दुर्गा,तूच संकटातला आधार,तूच न्यायाची चंद्रघंटा,तूच निराधारांचा आधार..
छावा डिजिटल न्यूज पोर्टल सचिन मयेकर रेवदंडा गुरुवार २५ सप्टेंबर २०२५
शिक्षिका : ज्ञानाची सरस्वती
एखादं छोटं लेकरू शाळेच्या दारातून आत शिरतं तेव्हा त्याच्या डोळ्यांत कुतूहल असतं, भीती असते, निरागसता असते.त्या लेकराला अक्षरं ओळखायला शिकवणं, पेन्सिल बरोबर पकडायला लावणं, पहिल्यांदा “अ” ते “अं” लिहायला बसवणं हे सगळं ज्या व्यक्तीमुळे शक्य होतं ती म्हणजे शिक्षिका.शिक्षिका फक्त धडे शिकवत नाहीत,तर मुलांच्या आयुष्याला घडवतात, त्यांच्या मनातले अंधार दूर करून ज्ञानाचा दिवा लावतात.त्यांच्या आवाजात गोडवा असतो, नजरेत ममता असते आणि हातात भविष्य घडवण्याची ताकद असते.साळाव येथील JVM School चा अभिमानआपल्या साळाव गावातील JVM School हे अनेक मुलांचं भविष्य घडवणारं मंदिर आहे.
सविता जॉय मॅडम
या मंदिरात ज्ञानाची सरस्वती म्हणून उभ्या आहेत सविता जॉय, एलिझाबेथ झीना आणि अनाया घरत.त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाचं बीज रुजवलं आहे.त्यांच्या संयमाने रडणारं लेकरू शांत झालं,त्यांच्या प्रेमळ शब्दांनी भीतीने थरथरणारे हात लिहायला लागले,आणि त्यांच्या मार्गदर्शनाने गोंधळलेले विद्यार्थी जीवनाचा खरा मार्ग पकडू शकले.मुलांसाठी दुसरी आईविद्यार्थ्यांना शिक्षक-
एलिझाबेथ झीना मॅडम
शिक्षिकांमध्ये केवळ गुरू दिसत नाही,तर दुसरी आई, दुसरे वडील दिसतात.त्यांच्या कुशीत बसून मुलं सुरक्षित वाटतात.त्यांच्या एका कौतुकाच्या वाक्याने मुलांचं मन आनंदाने भरून जातं,आणि त्यांच्या एका शिस्तीच्या शब्दाने विद्यार्थी आयुष्यभर शहाणपण शिकतात.
अनाया घरत मॅडम
त्याग आणि समर्पण
शिक्षिकांचं आयुष्य सोपं नसतं.घरची कामं उरकून शाळेत येणं.पण तरीही मुलांच्या भविष्यासाठी मनापासून झटणं
हा त्यांचा खरा त्याग आहे.
त्यांच्या या समर्पणामुळेच मुलं मोठी होऊन डॉक्टर, इंजिनीअर, वकील, पोलीस, शेतकरी, समाजसेवक होतात.
खरी सरस्वती
शाळेच्या वर्गातल्या फळ्यावर पांढऱ्या खडूने काढलेली रेघ म्हणजे भविष्याचं पाऊल.ते पाऊल टाकायला शिकवणाऱ्या सविता जॉय, एलिझाबेथ झीना आणि अनाया घरत
या खऱ्या सरस्वती आहेत.
त्यांच्या आशीर्वादाशिवाय मुलांचं आयुष्य पूर्ण होऊच शकत नाही.म्हणूनच म्हणावं लागतंसाळाव येथील JVM School मधील या तीन सरस्वतीसविता जॉय, एलिझाबेथ झीना आणि अनाया घरत या आपल्या गावाचा खरा अभिमान आहेत.त्यांच्याशिवाय समाजाचं भवितव्य घडणं अशक्य आहे.
डॉक्टर (anaesthesiologis) जीवाची रखवालदार देवी
रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर म्हणजे जीवन-मृत्यूचा तोल साधणारी जागा.बाहेर कुटुंबीयांच्या डोळ्यांत चिंता, भीती आणि असहाय्यतेचे भाव असतात.पण आत एक अशी व्यक्ती असते, जिला फारसं कोणी ओळखत नाही,जिच्या कामाचं कौतुक फारसं होत नाही,पण जिच्या दक्षतेवर शेकडो जीव अवलंबून असतात.ती म्हणजे anaesthesiologis डॉक्टर.जीवाचं संतुलन राखणारीऑपरेशन सुरू होण्याआधी रुग्णाला बेशुद्ध करणं,त्याच्या श्वासावर, नाडीवर, रक्तदाबावर लक्ष ठेवणं हे काम दिसायला साधं वाटतं, पण हेच खरं जीवाचं संतुलन राखणं असतं.सर्जनचे हात शस्त्रक्रियेत व्यस्त असतात,पण त्या हातांना यशस्वी बनवण्यासाठी मागे जी सावली उभी असते,ती म्हणजे anaesthesiologis.आईच्या वेदना शांत करणारीडिलिव्हरीसारख्या प्रसंगी आई मृत्यूशी झुंजत असते.तेव्हा आईला सुरक्षित ठेवणं, तिच्या वेदना कमी करणं,आणि लेकरू बाहेर येईपर्यंत तिच्या प्राणांची निगा राखणं ही जबाबदारी डॉक्टर प्राजक्ता वरसोलकर
यांच्यासारख्या anaesthesiologis असते.त्यांच्या औषधाच्या एका थेंबात आईचं जीवन सुरक्षित राहतं,आणि एका श्वासाने बाळाला नवीन जीवन मिळतं.
शांत पण अमूल्य योगदान
ऑपरेशन संपलं की लोक लगेच सर्जनला धन्यवाद देतात.गायनेक, हृदयरोगतज्ज्ञ, हाडांचे तज्ज्ञ – सगळ्यांचं नाव घेतलं जातं.पण त्या मागे जी शांतपणे काम करत असते,जी थकूनही न डगमगता रुग्णाची नाडी पाहत राहते,तिचं नाव क्वचितच घेतलं जातं.पण तिच्याशिवाय ऑपरेशन अशक्य आहे.ती आहे खरी देवीची सावली – लोकांना न दिसणारी पण जीवन वाचवणारी.आपल्या रेवदंड्याची अभिमानाची मुलगी डॉ. प्राजक्ता वरसोलकरआपल्या गावातल्या डॉ. प्राजक्ता वरसोलकर ह्या अशा ऑनेस्थेसियोलॉजिस्ट.त्यांचं काम लोकांच्या नजरेस पडत नाही,पण त्यांच्यामुळेच कित्येक आई आज बाळाला कुशीत घेत आहेत,कित्येक रुग्ण आज पुन्हा आपल्या घरी परतले आहेत.त्यांच्या हातून दिलेलं औषध हे केवळ औषध नसूनते म्हणजे जीवदानाचं वरदान आहे.
मी खरी आरोग्यदायिनी देवी
आपण नेहमी देवीला फुलं वाहतो, पण खऱ्या देवीला आपण पाहू इच्छित असाल,तर ऑपरेशन थिएटरच्या त्या शांत कोपऱ्यात बघा तेथे डॉ. प्राजक्ता वरसोलकर सारखी जिवंत देवी रुग्णांचा जीव सांभाळत उभी असते.त्यांच्या डोळ्यांत माया आहे, हातात जबाबदारी आहे,आणि मनात एकच भावना आहे “हा जीव सुरक्षित राहायलाच हवा.”
👉 म्हणूनच म्हणावं लागतं
डॉ. प्राजक्ता सारख्या ऑनेस्थेसियोलॉजिस्ट डॉक्टर म्हणजेच खरी आरोग्यदायिनी देवी,जिच्या सावलीशिवाय जीवनाचा प्रवास शक्य नाही.
वकील : न्यायाची चंद्रघंटा
न्यायालयाची दारं एखाद्या सामान्य माणसासाठी नेहमीच थोडी भितीदायक, थोडी अवघड वाटतात.पण त्या दारातून आत शिरल्यावर, निराधार लोकांच्या मागे उभं राहून त्यांचा आवाज बनते वकील स्त्री.तिचा आवाज म्हणजे केवळ कायद्याचे कलम नव्हे,
तर पीडितांच्या वेदनांचा आक्रोश, समाजातील अन्यायाचा प्रतिकार.ज्या क्षणी ती न्यायालयात उभी राहते, त्या क्षणी तिच्या शब्दांत देवी चंद्रघंटेचा नाद उमटतो.तो नाद केवळ न्यायालयात नाही, तर समाजातही घुमतो.
अत्याचारितांची आधारवड
घरगुती हिंसा असो, मुलींवरील अत्याचार असो, गरीबांना झालेला अन्याय असो या सगळ्यांना आधार देणारी ती वकील असते.तिच्या खांद्यावर केवळ एखाद्या प्रकरणाचा भार नसतो,तर संपूर्ण समाजाच्या विश्वासाचा भार असतो.
कायद्याची भाषा आशेचा श्वास
कायद्याची भाषा सर्वसामान्यांना कळत नाही.पण वकील स्त्री तो कायदा सोप्या भाषेत मांडते,आणि अन्यायाविरुद्ध लढायला पीडितांना बळ देते.तीच खरं तर आशेचा श्वास फुंकते.
त्याग आणि संयम
वकील स्त्रीसाठी हे काम केवळ व्यवसाय नाही,तर तिच्यासाठी हे समाजसेवेसारखंच आहे.रात्रंदिवस कागदपत्रांत गुंतूनही ती संयम राखते,कारण तिला माहीत असतं तिच्या एका शब्दाने एखाद्याचं आयुष्य बदलू शकतं.समाजातील देवी श्रद्धा प्रदीप वैद्यवकील केवळ न्यायालयापुरत्या मर्यादित राहत नाहीत.त्या समाजातही अन्यायाविरुद्ध आवाज उठवतात,लोकांच्या मनात विश्वास निर्माण करतात की “आपण एकटे नाही, आपल्या मागे कायद्याची आणि न्यायाची देवी उभी आहे.”आपल्या गावातील श्रद्धा प्रदीप वैद्य ह्या अशाच न्यायासाठी लढणाऱ्या चंद्रघंटा.त्यांच्या शब्दांत सामर्थ्य आहे, त्यांच्या आवाजात धैर्य आहे,आणि त्यांच्या अस्तित्वात न्यायासाठीची खरी ओढ आहे.देवळात घंटा वाजली की आपल्याला देवीचं स्मरण होतं.न्यायालयात श्रद्धा वैद्य सारखी वकील उभी राहते,तेव्हा तिच्या आवाजातही तोच घंटानाद ऐकू येतो.
👉 म्हणूनच म्हणावं लागतं
वकील श्रद्धा प्रदीप वैद्य म्हणजे समाजाची खरी चंद्रघंटा,जिच्या आवाजात अन्यायाविरुद्धचा आणि न्यायासाठीचा अखंड नाद घुमतो.
![]()







