गणेशोत्सवाआधी रेवदंडा स्वच्छतेचा संकल्प – एकूण ५५.८५ टन कचरा साफ

सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल २४ ऑगस्ट २५

 डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने, डॉ. श्री दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. श्री सचिन दादा धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने आज साळाव चेक पोस्ट ते रेवदंडा बाजारपेठ  दुतर्फा स्स्ता, नागाव गावातून अक्षीपर्यंत, सहाण बायपास रस्ता तें बेलकडे पर्यंत, अलिबाग रस्ता असे स्वच्छता  अभियान आज राबविण्यात आले.

गणपती बाप्पाच्या आगमनाआधीच गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात गावातील मारूती आळी व इतर अंतर्गत रस्त्यांची उद्धा सखोल साफसफाई करण्यात आली. अभियानादरम्यान झाडझुडप, कचरा, प्लास्टिक व घाण हटवून रस्ते स्वच्छ करण्यात आले. तब्बल अनेक पिकअप टेम्पो इतका कचरा व घनकचरा संकलित करून डम्पिंग ग्राउंडवर त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली. या स्वच्छता मोहिमेमुळे गावातील प्रमुख रस्ते व अंतर्गत मार्ग नव्या उत्साहाने उजळून निघाले. या उपक्रमात प्रतिष्ठानचे सदस्य, स्थानिक ग्रामस्थ व कार्यकर्ते मिळून हजारोच्या संख्येने स्वयंसेवक सामील झाले होते. सकाळपासूनच गावभरात श्रमदानाचे वातावरण पाहायला मिळाले. लहानांपासून तरुणांपर्यंत सर्वांनीच हातात झाडू, फावडे घेत रस्ते स्वच्छ करण्यासाठी आपला सक्रिय सहभाग नोंदवला.आज या स्वच्छता अभियानत एकूण  ५५. ८५ टन  एवढा कचरा काढण्यात आला.गणपती बाप्पाचे आगमन स्वच्छ व पवित्र वातावरणात व्हावे, गावाचा चेहरा उजळून निघावा, या उद्देशाने केलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी मनापासून स्वागत केले.

त्याचबरोबर साळाव ते रेवदंडा दुतर्फा रस्ता, गावातील अंतर्गत गल्ल्या, नागाव–सहान बायपास रोड, नागाव गावातून आक्षीपर्यंत, बेलकडेपर्यंत आणि अलिबागकडे जाणाऱ्या दुतर्फा रस्त्यांचीही स्वच्छता करण्यात आली.

अभियानादरम्यान झाडझुडप, कचरा, प्लास्टिक व घाण हटवून रस्ते स्वच्छ करण्यात आले.

डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तर्फे फक्त स्वच्छता अभियानच नव्हे, तर विविध सामाजिक उपक्रम वेळोवेळी राबवले जातात. त्यामध्ये वृक्ष लागवड, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, पर्यावरण संवर्धन उपक्रम अशा अनेक उपक्रमांचा समावेश आहे. हे उपक्रम केवळ रायगड तालुक्यातच नव्हे, तर महाराष्ट्र, देशभर तसेच विदेशातही मोठ्या प्रमाणावर राबवले जात असल्याने समाजसेवेच्या माध्यमातून प्रतिष्ठानने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आजची ही स्वच्छता मोहीम हा त्याच सेवाभावाचा एक उत्तम नमुना ठरला असून, गणेशोत्सवाच्या स्वागताला खऱ्या अर्थाने नवा उजाळा मिळाला आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *