आज गोकुळात नंदलाल श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव

दिनांक : १६ ऑगस्ट २०२५
लेखक : सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल
आज संपूर्ण देशभर विशेषतः महाराष्ट्रात भक्तिभाव आनंद आणि उत्साहाने श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी होत आहे
मध्यरात्री बारा वाजता मंदिरांमध्ये शंखनाद घंटानाद भजन कीर्तनाच्या लहरींनी वातावरण भारून जाईल
नंद घर आनंद भयोचा गजर होईल आणि फुलांच्या आरासात चांदी सोन्याच्या पाळण्यात बाळकृष्ण विसावतील
जन्माष्टमी म्हणजे केवळ उत्सव नव्हे तर धर्माच्या विजयाची कथा आहे
कंसाच्या कारागृहात भीषण अंधारात वसुदेव आणि देवकीने आपल्या आठव्या मुलाला श्रीकृष्णाला जन्म दिला
आकाशातून पाऊस कोसळत होता यमुना नदी पुरात वाहत होती पण वसुदेवांनी त्या बाळाला डोक्यावर घेऊन हातात नागफणीचा काठी पायाखाली पाणी आणि हृदयात अढळ श्रद्धा ठेवून गोकुळात नेऊन ठेवले
तिथे नंद आणि यशोदा यांनी त्याला आपल्या लेकरासारखं वाढवलं
गावोगावी मंदिरांमध्ये आज विशेष आरास झांकी आणि सजावट पाहायला मिळते
फुलांच्या माळा मोरपंख बांसुरी रंगीबेरंगी दिवे आणि फुलरंगी रांगोळीने मंदिरे उजळून निघतात
पाळण्यात बसलेल्या बालकृष्णाच्या मूर्तीभोवती गोपिकांची झांकी ग्वाळ्यांचे खेळ आणि माखन चोरीचे नाट्य रंगते
शाळा महिला मंडळे आणि सांस्कृतिक संस्था रंगीत झांकी स्पर्धा घेतात
जन्माष्टमी म्हटलं की दहीहंडीशिवाय उत्सव अपूर्णच
कान्ह्याच्या माखन चोरीच्या आठवणींना उजाळा देत तरुण तरुणींचे पथक उंच मानवी मनोरे रचतात
गावातील चौक मैदाने गल्लीबोळात जयघोष ढोल ताशांचा नाद आणि आकाशातून उडणाऱ्या फुलांच्या पाकळ्यांनी सारा परिसर साजरा होतो
दहीहंडी म्हणजे केवळ खेळ नाही ती आहे एकता साहस आणि सहकार्याचा प्रतीक
श्रीकृष्ण केवळ गोकुळातील बाळ नव्हता तर तो होता धर्माचा रक्षक आणि नीतीचा मार्गदर्शक
गीतेतून त्याने जगाला कर्मयोग भक्तियोग आणि ज्ञानयोग शिकवला
त्याने अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद दिली आणि प्रेम करुणा सत्य आणि क्षमा या मूल्यांचा संदेश दिला
आजच्या या जन्माष्टमीला आपण आपल्या अंतःकरणातील कंस म्हणजे राग लोभ मत्सर अहंकार यांचा नाश करूया आणि आपल्या मनात प्रेम श्रद्धा नि:स्वार्थ सेवा यांचा जन्म घडवूया
आज मध्यरात्री बारा वाजता मंदिरांच्या पाळण्यात झुलणारा कान्हा पाहताना लक्षात ठेवा तो केवळ देव नाही तो आहे आपल्या प्रत्येकाच्या मनातील आनंद श्रद्धा आणि नैतिकतेचा दीप
गोकुळाचा नंदलाल आपल्याला आठवण करून देतो की अंधार कितीही गडद असो श्रद्धा आणि धर्म यांचा प्रकाश नेहमी विजय मिळवतो