बारशिव गावाजवळ अपघात, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

छावा दि.१४ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर)
रेवदंडा – रेवदंडा-मुरुड मार्गावरील बारशिव गावाजवळ रविवारी सकाळी भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. कार आणि दुचाकीच्या जोरदार धडकेत हे दोघे गंभीर जखमी झाले होते. अपघात इतका भीषण होता की, घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.
मयतांची नावे अक्षय किसनलाल जयस्वाल (वय २७) व लालचंद्र रामप्रसाद गौड (वय ३५, दोघेही रा. मुरुड) अशी आहेत. हे दोघे मोटारसायकल (MH 06 BK 8031) वरून रेवदंडा बाजूकडून मुरुडच्या दिशेने जात होते. बारशिव गावाजवळ समोरून भरधाव वेगात येणाऱ्या कारने (MH 06 BU 2744) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातप्रकरणी कारचालक संदीप प्रभाकर म्हात्रे (वय ४९, रा. अलिबाग) याच्याविरुद्ध रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस उपनिरीक्षक श्री. म्हशीलकर यांच्याकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
हा अपघात गावकऱ्यांमध्ये हळहळ निर्माण करणारा असून या मार्गावरील वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे.