६५ वर्षीय आजोबांचा बिडीने केला घात

महाराष्ट्र (दि.०४ जून) – बीडी ओढणे आरोग्यास घातक मानले जाते, मात्र भंडारा जिल्ह्यातील एका ६५ वर्षीय वृद्धासाठी ते प्राणघातक ठरले.
बीडी शिलगावत असताना कपड्यांना आग लागल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.ही घटना मंगळवारी भंडारा जिल्ह्यातील लाखणी तालुक्यातील मानेगाव गावात घडली असून, बुधवारी पोलीसांनी याबाबत माहिती दिली. मृत व्यक्तीचे नाव ओमप्रकाश कांबळे (वय ६५) असे आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमप्रकाश कांबळे हे गेल्या पाच वर्षांपासून अर्धांगवायूने ग्रस्त होते आणि बहुतांश वेळा अंथरुणावरच असायचे.मृत व्यक्ती बीडी ओढण्याचा व्यसनी होता. मंगळवारी घरात कोणीही नसताना त्यांनी बीडी पेटवली. त्याच दरम्यान त्यांच्या अंगावरील कपड्यांना अचानक आग लागली. या आगीत त्यांना गंभीर भाजल्यामुळे जागीच मृत्यू झाला.पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून, ही दुर्दैवी घटना गावात हळहळ व्यक्त केली जात आहे