१३ लाखांच्या चरस रॅकेटचा भांडाफोड नेपाळ–उत्तरप्रदेशाशी संबंध, १३ जण अटकेत

छावा दि.१३ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर)
पोलिस अधिक्षक आचल दलाल यांच्या नेतृत्वाखाली धडक कारवाई
रायगड पोलिसांनी मोठी कारवाई करत नेपाळ आणि उत्तरप्रदेशहून चरस आणणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. २ दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील विविध ठिकाणी छापे टाकून तब्बल १३ लाख ४२ हजार रुपयांचा चरस जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी १३ जणांना अटक करण्यात आली आहे.
ही संपूर्ण कारवाई रायगडचे पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही चरस उत्तर भारतातून गोव्यासाठी जात होती. गोपनीय माहितीच्या आधारे साखर-सुतारवाडी, नागाव, बोर्लीपंचतन परिसरात हे जाळे पसरले होते. आरोपी हे गोव्यातील ड्रग सप्लायर्ससाठी चरस पोहोचवत होते.
या टोळीचा प्रमुख बिहारचा असून, त्याचे नेपाळशी संबंध आहेत. या कारवाईमध्ये पोलिसांनी १३ लाख ४२ हजारांची चरस, २ चारचाकी, १ दुचाकी, १४ मोबाईल फोन, १ लाख १६ हजारांची रोकड, अशा एकूण २३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
विक्री करणारे हे चरस खरेदी करीत गोव्यास आणि स्थानिक युवकांमध्ये विक्री करत होते. मुख्यत्वेकरून आरोपींमध्ये विदेशी आणि उत्तर भारतातील तरुणांचा समावेश असून, रायगडातील काही युवकही या नेटवर्कमध्ये सहभागी झाले होते.
या टोळीमध्ये प्रमुख आरोपी मो. हबीब (बिहार), अनूप सेवालाल (नेपाळ), विक्रम सिंग (उत्तरप्रदेश), अनूप सेवालाल, अशोक सिंग, शंकर सिंग, सतीश पाटील, अजित कदम, स्वप्नील खोत, रवींद्र खोत, विजय देशमुख, मनाली देशमुख, रोहित पाटील यांचा समावेश आहे.
या सर्वांवर अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार (NDPS Act) गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक वर्षा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.