हिरकणीवाडीत शिवजयंती उत्सव दणक्यात! शिवज्योत तरुण मित्र मंडळ व ग्रामस्थ मंडळाचा भव्य जल्लोष
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर | रायगड —हिरकणीवाडी 📅शुक्रवार | ²० फेब्रुवारी २०२६
स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हिरकणीवाडीत शिवज्योत तरुण मित्र मंडळ व ग्रामस्थ मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्सव २०२६ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भगव्या पताकांनी परिसर दुमदुमला, जयघोषांनी वातावरण भारावून गेले आणि ग्रामस्थांनी एकत्र येत शिवरायांना अभिवादन केले.
या उत्सवासाठी शिवजयंती उत्सव कमिटी २०२६ अंतर्गत श्री. रामचंद्र बाबू आकिरकर, मा. मंदाताई चेतनशेट ओकीरकर (सदस्य, रायगड जिल्हा परिषद), मा. चेतनशेट ओकीरकर (उद्योजक), श्री. सखाराम ओकीरकर, श्री. लहूशेठ ओकीरकर, श्री. पप्पू बाबू ओकीरकर, श्री. सुनिल धाकटू ओकीरकर, श्री. प्रदीप रचि ओकीरकर, श्री. रमेश धाकटू ओकीरकर, श्री. सिताराम झीर, श्री. निलेश किसन ओकीरकर, श्री. सुरेश आखाडे, श्री. तानाजी महादेव ओकीरकर, श्री. मनिष मोरे, श्री. चाळाराम महाबळे, श्री. गणेश झोरे, श्री. मलिष ओकीरकर, श्री. लक्ष्मण ओकीरकर, श्री. रविराज ओकीरकर, श्री. रमेश बाळाराम ओकीरकर, श्री. संदिप चाळाराम दुबळे, श्री. सुनिल शिवे, श्री. देवानंद ओकीरकर, श्री. चंद्रकांत रायचा ओकीरकर, श्री. आकाश दिस्व, श्री. दिलीप चाबू ओकीरकर, श्री. मनोज मोतिराम ओकीरकर, श्री. सिताराम रामचंद्र ओकीरकर, श्री. संकेश सुरेश ओकीरकर, श्री. संभाजी महादेव ओकीरकर, श्री. रूपेश झरी, श्री. सुदाम ओकीरकर, श्री. अनिल कोकरे, श्री. चंद्रकांत बाळाराम ओकीरकर, श्री. गजानन वसंत ओकीरकर, श्री. आकाश महाबळे, श्री. अंकेश ओकीरकर (खजिनदार), श्री. संदिप शिवे, श्री. अभिर ओकीरकर, श्री. शिवाजी ओकीरकर, श्री. मंगेश ओकीरकर, श्री. अक्षय पाळेकर, श्री. गणेश चाचू ओकीरकर, श्री. मंगेश शिवे, श्री. गणेश बळीराम ओकीरकर, श्री. मंगेश राजू ओकीरकर, श्री. महेश मोतिराम ओकीरकर, श्री. शशिकांत हिरवे, श्री. जयेश हिचे, श्री. शुभम राईलकर, श्री. राजुल उबळे, श्री. बाबू आखाडे, श्री. अक्षय जगल ओकीरकर, श्री. शशिकांत गोरे, श्री. विलास महाबळे, श्री. गणेश वसंत ओकीरकर, श्री. मनोहर भांबू ओकीरकर, श्री. अजित धाकटू ओकीरकर, श्री. श्याम मोतिराम ओकीरकर, श्री. मनोहर धाकट ओकीरकर, श्री. राम मोतिराम ओकीरकर, श्री. प्रचिन यांचूरंग ओकीरकर, श्री. रमेश नारायण ओकीरकर, श्री. गणेश वाचले सर, श्री. वशवंत रामचंद्र ओकीरकर, श्री. रमेश धाकट ओकीरकर, श्री. महेश बाबधाणे, श्री. ऋषिकेश ओकीरकर, श्री. सखाराम नारायण ओकीरकर, श्री. गणेश चंद्रकांत गोरे, श्री. संतोष नारायण ओकीरकर आदींनी परिश्रम घेत उत्सव यशस्वी केला.
संपूर्ण गाव भगवामय झाले होते. युवक, महिला मंडळे आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. हिरकणीवाडीतील हा उत्साह स्वराज्याच्या विचारांची जपणूक करणारा ठरला.तसेच शिवजयंतीनिमित्त गावातील सुमारे १२० घरांसमोर छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी भक्तिभावाने फिरविण्यात आली. प्रत्येक घरासमोर कुटुंबीयांनी आरती करून महाराजांना अभिवादन केले. भगव्या पताकांनी सजलेले अंगण, फुलांची उधळण आणि “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी संपूर्ण गाव दुमदुमून गेले. स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम! 🚩
जय भवानी! जय शिवाजी! 🚩🔥
![]()

