सुधाकर बडगुजर यांना निरोपाचा नारळ
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंचा ॲक्शन मोड
पक्षविरोधी कारवायांचा ठपका

संकलित छायाचित्र
मुंबई (वृत्तसंस्था, ५ जून) उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या नाशिक जिल्हा उपनेते सुधाकर बडगुजर यांची पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा ठपका ठेवत पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. ही कारवाई बडगुजर यांनी २ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाशिकमध्ये भेट घेतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत सुधाकर बडगुजर यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीबाबत आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी दावा केला होता की उ.बा.ठा.तील डझनभर नेते व कार्यकर्ते पक्षात नाराज आहेत. यासोबतच नाशिकचे उ.बा.ठा. प्रमुख विलास शिंदे हे देखील पक्षाच्या कामकाजाने असमाधानी असल्याचे त्यांनी सांगितले होते.
या पार्श्वभूमीवर उ.बा.ठा. पक्षाने बुधवारी अधिकृतरित्या सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी केली, असे पक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे.