सलाम तुझ्या बहाद्दूरीला…

छावा दि.१८ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर)
सलाम तुझ्या बहाद्दूरीला…
गेली का रे परत?
एमएसईबी वाले काही करत नाहीत का?
– असे आपण सहज म्हणतो…
पण लाईट परत येते कशी? कोण आणतो ती?
रेवदंडा गावातील या फोटोतील योद्ध्याकडे पाहा —
सुमारे २८ फूट उंच पोलावर चढलेला, अंगावर धूप आणि डोक्यावर धोका…
फक्त आपल्या घरात पुन्हा उजेड यावा म्हणून हा माणूस स्वतःचा जीव धोक्यात घालतोय!
कधी पावसात, कधी वादळात, कधी रात्री अपरात्री –
एमएसईबीचे हे खरे ‘लाईफमॅन’ आपल्या सुरक्षिततेची, सोयीची आणि अंधारापासून मुक्ततेची जबाबदारी पेलत असतात.
हे केवळ नोकरी नाही — ही सेवा आहे. ही धाडसाची कहाणी आहे.
म्हणून म्हणावंसं वाटतं –
“सलाम तुझ्या कामाला…
सलाम तुझ्या धाडसाला…
आणि सलाम तुझ्या कुटुंबालाही — जे दररोज तुला धोका पत्करू देतं!”