शिवरायांची रणश्री भाग ५ : प्रतापगडाची रणगर्जना – अफजलखान वध

हा लेख छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावरील विविध ऐतिहासिक संदर्भ, संशोधनात्मक माहिती आणि उपलब्ध कागदपत्रांवर आधारित असून सलग अनेक दिवसांचे अभ्यास व माहिती संकलन करून लिहिला आहे. लेख लिहिण्यामागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी कोटी कोटी नमन.

सचिन मयेकर ‘छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल. २० सप्टेंबर २०२५

प्रत्येक संकटावर मात करणारा सिंहासनावर बसलेला सिंह म्हणजे आपला छत्रपती शिवाजी महाराज.अरे बघा ना… एकामागोमाग एक संकट येत होतं. पण महाराज डगमगले नाहीत. छाती काढून, मान ताठ करून ते संकटाच्या तोंडावर उभे राहिले.असंच एक भयानक संकट आलं – अफजलखान..त्याच्याकडे चाळीस हजारांची फौज…आणि महाराजांकडे फक्त दहा हजार मावळे..
काळा दिवस – सईबाईंचा निरोप
महाराज राजगडावर होते. त्यांच्यासोबत होती त्यांची पत्नी सईबाईसाहेब. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं…सईबाईंचं निधन झालं.तान्हा संभाजीराजे रडत रडत म्हणाले –अगं आई… उठ.. संकट आलंय अफजलखान नावाचं… उठ ना आई..पण आई उठली नाही.राजाचा संसार संपला.पण महाराजांचा संसार हा वैयक्तिक नव्हता – तो होता स्वराज्याचा संसार..म्हणूनच आज आपला संसार फुललेला आहे.
अफजलखानाची चाल
अफजलखानानं पत्र पाठवलं – “येतो प्रतापगडावर, भेटूया.”महाराजांनी प्रत्युत्तर दिलं – पण त्या पत्रातच त्याचं मनोधैर्य खच्ची केलं.हत्ती मारून त्याला दाखवलं – तुझंही असंच होईल.रणतुंडी घाटातून खानाची फौज कोंडली – चाळीस हजारांतून वीस हजार उरले.भेटीची वेळ ठरली दुपारी बारा वाजता.कारण सूर्य डोक्यावर असतो. अफजलखान वर बघेल तर डोळ्यांत चटका बसेल. महाराज वरून खाली सहज नजर ठेवतील. इतकं बारकं नियोजन.
मृत्यूला डोळ्यांनी सामोरं
महाराज पायऱ्या उतरत होते – मृत्यू समोर दिसत होता.पण मनात फक्त एकच विचार –माझं स्वराज्य जगलं पाहिजे.सोबत जीवा महाला, संभाजी कावजी कोंढाळ.महाराजांनी अंगावर चिलखत घेतलं, डोक्यावर जिरेटोप बांधला.नवं अस्त्र – वाघनख – हातात आलं.शामियान्यात प्रवेश झाला.अफजलखान पुढे आला.आओ शिवाजी, हमारे गले मिलो.महाराज पुढे सरसावले.पहिल्या आलिंगनात काही नाही…दुसऱ्या आलिंगनात अचानक कट्यार बाहेर.कट्यार महाराजांच्या पाठीवर आदळली.पण महाराज अंगात चिलखत घालून आले होते.
वाघनखाची गाज
क्षणात महाराजांचा हात बाहेर –वाघनख पोटात खुपसलं.अफजलखानाचं पोट फाटलं, आतडी बाहेर आली.तो धडपडत ओरडला – सैय्यद, बचाओ सैय्यद बंडा दांडपट्टा घेऊन झेपावला.महाराजांचा जीवा महाला पुढे आला – दांडपट्टा खाली पाडला.इतिहासात सोन्याने लिहिलं गेलं होता जीवा म्हणून वाचला शिवा…बाहेर संभाजी कावजी तलवार घेऊन थांबले होते.क्षणात त्यांनी अफजलखानाचं शीर उडवलं.ते शीर घेऊन उभे राहिले महाराजांसमोर.महाराज म्हणाले –कशाला रे एवढं धाडस केलंस?संभाजी कावजी म्हणाले महाराज, तुम्ही वाघनख खुपसल्यावर तो जगला की नाही हे माहीत नव्हतं, म्हणून खबरदारी घेतली.महाराजांचे डोळे पाणावले जर तुला काही झालं असतं, तर तुझ्या आईला आम्ही काय उत्तर दिलं असतं.
प्रतापगडाचा गडगडाट
खान रक्तबंबाळ होऊन पडताच, प्रतापगडाच्या डोंगरकड्यांवरून मराठी मावळे विजेसारखे झेपावले.अचानक युद्ध पेटलं.मावळ्यांच्या तलवारी चमकू लागल्या, रणांगणावर शत्रूचे हजारो सैनिक गारद झाले.मराठी शौर्य आणि गनिमी काव्याच्या डावपेचांसमोर आदिलशाहीचा गर्व चिरडला गेला.प्रतापगड दुमदुमला, डोंगरकड्यांनीही जणू गजर केला हा विजय स्वराज्याचा आहे.
भगव्याची गाथा
या विजयाने स्वराज्य दणाणून गेलं.महाराज तेथून  कोल्हापूरला गेले आणि पन्हाळ्यावर  भगवा फडकावला.
तो भगवा म्हणजे
भ – भय रहित
ग – गर्व रहित
वा – वासनारहित
भगवा म्हणजे प्रभू श्रीरामाचा, वारकऱ्यांचा, निष्ठेचा, त्यागाचा आणि धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदानाचा रंग!अफजलखान वध हा केवळ एका सरदाराचा पराभव नव्हता, तर तो होता स्वराज्याच्या ध्वजाचा पहिला गडगडाटी जयघोष.या घटनेने महाराष्ट्राच्या जनतेला आत्मविश्वास दिला आता आपलं राज्य होणारच.प्रतापगडाच्या पायथ्याशी उमटलेली ती रणश्री आजही इतिहासाच्या पानांतून गर्जते.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *