शिवरायांची रणश्री भाग ४ गनिमी काव्याचा जन्म

हा लेख छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावरील विविध ऐतिहासिक संदर्भ, संशोधनात्मक माहिती आणि उपलब्ध कागदपत्रांवर आधारित आहे. लेख लिहिण्यामागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी कोटी कोटी नमन.
तोरणा व रायगडाच्या विजयाने स्वराज्याचे पहिले पायाभरणी झाली. पण पुढे समोर होती आदिलशाही, निजामशाही आणि मुघलांची महासत्ता. शत्रूंची फौज हजारोंमध्ये, शेकडो हत्ती-घोडे, तोफा आणि रसद. आणि आपल्या बाजूला? काही हजार मावळे, त्यांच्या हातात साधे भाले, तलवारी आणि धनुष्यबाण
सचिन मयेकर, ‘छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल. १२ सप्टेंबर २०२५
अशा असमतोल शक्तीचा सामना करायचा तर सरळ युद्ध म्हणजे आत्मघात.पण शिवरायांची बुद्धी तलवारीपेक्षाही तीक्ष्ण होती. त्यांनी ठरवलं शत्रूला पराभूत करायचं असेल तर सरळ भिडायचं नाही, तर छळायचं, थकवायचं आणि भीती बसवायची.
यातून जन्म झाला — गनिमी कावा.
मावळ्यांनी शत्रूच्या छावण्यांवर अनेकदा रात्री अचानक धडक दिली.शत्रूच्या घोड्यांना सोडून दिलं, रसद जाळून टाकली, तोफांची दारुगोळ्यांची पेटारे पेटवून दिली.रात्रभर शत्रू घाबरून बसायचा कुठून मराठे धडक मारतील याचा ठाव नाही.एकदा शत्रूने घाटात मोठं तळ ठोकलं. थेट भिडणं धोक्याचं होतं.महाराजांनी सांगितलं तलवार न उगारता यांना हरवायचं आहे.मावळ्यांनी जवळचं धरण फोडलं.रात्रीच्या वेळी छावणीत प्रचंड पाण्याचा पुर शिरला.सैन्य, घोडे, हत्ती, तोफा सगळं गाळात अडकून बसलं.पुढच्या दिवशी शत्रूची छावणी पाण्यात चिखलात बुडालेली होती, सैनिक थकलेले आणि घाबरलेले होते.पारगड घाटातून आदिलशाहीची हजारोंची फौज चालत होती.शिवरायांनी आदेश दिला थेट भिडायचं नाही. झाडांवर लपून बाण सोडा, दगड ढकला.मावळे झाडांच्या फांद्यांवर लपलेले.अचानक आकाशातून बाणांचा पाऊस सुरु झाला.डोंगरावरून दगड कोसळले, रणगर्जना दुमदुमली जय भवानी! जय शिवराय!शत्रूला वाटलं, हजारोंचा सैन्य त्यांच्यावर चालून आलंय. भीतीने त्यांनी पळ काढला.एका लढाईत शत्रूने वेढा दिला.मावळ्यांची संख्या कमी.महाराजांनी ठरवलं आता आपण पळायचं.शत्रू आनंदाने मागे लागला.काही अंतर गेल्यावर मावळे अचानक थांबले, घोडे फिरवले आणि मागून धडकले.शत्रूला समजलंही नाही आणि मावळ्यांनी दुप्पट संख्येच्या सैन्याला गारद केलं.या डावपेचांनी शत्रू हादरले, पण खरी क्रांती झाली ती जनतेच्या मनात.जनतेला कळलं कमी सैन्य असूनही आपण जिंकू शकतो.स्वराज्य फक्त स्वप्न नाही, तर प्रत्यक्षात उतरलेली आशा आहे!शिवरायांनी सिद्ध केलं युद्ध जिंकायला ताकद नव्हे तर बुध्दी महत्वाची असते.गनिमी काव्याच्या डावपेचांनीच स्वराज्याचं बळ उभं राहिलं.मुघल, आदिलशाही, निजामशाहीच्या महालात थरथर उडू लागली.गनिमी कावा हा केवळ रणतंत्र नव्हता, तर तो होता मराठ्यांचा आत्मा, स्वराज्याचा श्वास, आणि जनतेच्या स्वाभिमानाचा पहिला गजर!