वसुबारस – मायेचा पहिला दिवस 

आज दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस.

सकाळीच गाईच्या गळ्यातली घंटा वाजते, अंगणात शेणानं लिपलं जातं, आणि घरभर एक वेगळीच गंध दरवळते.

आज गाईला ओवाळायचं असतं गूळ, चणे, हळद, कुंकू घेऊन सगळे तिच्या भोवती फिरतात.

छावा डिजिटल न्यूज पोर्टल –सचिन मयेकर– रेवदंडा  शुक्रवार  – १७ ऑक्टोबर २०२५

गाय म्हणजे फक्त जनावर नाही, ती घरातली आईच असते.

तिच्या दुधावर पिढ्या वाढल्या, तिच्या शेणानं शेती फुलली.

पण आता काळ बदललाय…

घरातल्या अंगणांची जागा सिमेंटने घेतली, आणि गोठे हळूहळू गायब झाले.

पूर्वी जिथं घराबाहेर गाय बांधलेली असायची, तिथं आता गॅलरीत फुलदाणी आहे.

गावातही काही घरांमध्येच गाई उरल्या — बाकी ठिकाणी वसुबारस फक्त नावापुरता राहिलाय.

लोक आता फुलांच्या फोटोला अगरबत्ती लावतात, आणि म्हणतात “वसुबारस साजरी झाली.”

खरं तर ही वेळ आहे पुन्हा त्या मायेच्या नात्याची आठवण ठेवायची.

गाय नाही मिळाली तरी तिचं स्थान मनात तरी ठेवा.

कारण वसुबारस म्हणजे शेण, दूध किंवा पूजा नव्हे

ती आहे आपल्या कृतज्ञतेची आणि प्रेमाची ओवाळणी.

जग बदललं तरी माया जुनीच आहे

आणि तीच माया म्हणजे वसुबारस.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *