वरसोलीतील मयुरेश पडवळ यांचे निधन; आज दुपारी अंत्यसंस्कार
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर १५ मार्च २०२६
अलिबाग : वरसोली येथील रहिवासी मयुरेश नंदकुमार पडवळ (वय ५०) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मनमिळावू स्वभाव, सर्वांशी स्मितहास्याने संवाद साधणारे मयुरेश यांना परिसरात ‘मया’ किंवा ‘महेश’ या नावानेही ओळखले जात असे. त्यांच्या अचानक निधनामुळे कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.
आज दिनांक १५ मार्च रोजी दुपारी १२ वाजता वरसोली येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक आणि मोठा मित्रपरिवार असा आप्तस्वकीयांचा परिवार आहे.
![]()

