वंदे भारतने जम्मू-कश्मीरच्या प्रगतीकडे वाटचाल
भारतीय रेल्वेला फारूक अब्दुल्ला यांची दाद
• छावा • नवी दिल्ली, १० जून • वृत्तसंस्था
अमरनाथ यात्रेसाठी वंदे भारतचा लाभ घेण्याचे भाविकांना आवाहन
नेशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूक अब्दुल्ला यांनी नुकत्याच सुरु झालेल्या श्रीनगर–श्री माता वैष्णो देवी कटरा वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या सेवेत त्यांनी विविध नेते, आमदार आणि मुख्यमंत्रीांचे सल्लागार श्री नसीर असलम वानी यांच्या सहप्रवासात अनुभव घेतला.
मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्री ज़हीर अब्दुल्ला आणि श्री ज़मीर अब्दुल्ला यांनीही वंदे भारत एक्सप्रेसमधील प्रवास अत्यंत आरामदायक आणि सुखद असल्याची प्रतिक्रिया दिली. त्यांनी रेल्वेच्या आधुनिक सुविधांची विशेष प्रशंसा केली.
या वेळी बोलताना डॉ. फारूक अब्दुल्ला म्हणाले, “भारतीय रेल्वेची ही सेवा जम्मू-कश्मीरमधील व्यापार, पर्यटन आणि संपर्क साधनांना एक नवा गतीमान प्रवाह देईल. हे पाऊल प्रगतीकडे नेणारे असून, संपूर्ण देशासाठी हे एक सुखद आणि प्रेरणादायी उदाहरण ठरेल.”
अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाविकांना वंदे भारत एक्सप्रेसचा लाभ घेण्याचे आवाहन केले. “ही ट्रेन केवळ प्रवासासाठी नाही, तर जम्मू-कश्मीरच्या एकात्म विकासासाठी एक महत्त्वाची वाटचाल आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
या प्रवासाद्वारे जम्मू-कश्मीरमध्ये जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीकडे होणारी वाटचाल अधोरेखित झाली आहे.