लालबागचा राजा : बाप्पा VIP लोकांसाठीचा? की कोळी बांधव सर्वसामान्यांचा

मुंबईतला गणेशोत्सव म्हटला की “लालबागचा राजा” हा भाविकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू! लाखो भक्त रांगेत उभे राहून तासन् तास थांबतात, फक्त बाप्पाचे एक दर्शन घ्यायला. पण दरवर्षी उठणारा तोच सवाल — “बाप्पा खरोखर सर्वांचा आहे का? की फक्त VIP चाच?”
मंडळाच्या स्थापनेचा पाया
1934 मध्ये लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्थापन झाले.
त्या वेळी कोळी बांधव + गिरणीकामगार हे मुख्य संस्थापक व कार्यकर्ते होते.
त्यामुळे कोळी समाज हा मूळ पाया आहे. आणि त्यांनाच जर व्यवस्थित वागणूक मिळत नसेल तर यापेक्षा अजून कोणती खंत असणार.
मंडपात गेलात तर VIP दर्शनासाठी वेगळ्या गल्ल्या, खास प्रवेशद्वारं, पोलिसांचा तगडा बंदोबस्त…
सामान्य भक्त मात्र घाम गाळत, चेंगराचेंगरीत जीव धोक्यात घालून ताटकळत बसतात.
आणि हे सर्व त्या लालबागच्या राजाच्या नावाखाली ज्याचा जन्मच कोळी बांधव व गिरणीकामगारांच्या नवसातून झाला होता.
हेच लोक मंडप उभारणारे, हाच समाज बाप्पाला घराघरात पोहोचवणारा…
पण दर्शनाच्या वेळी त्यांनाच दाराबाहेर थांबवायचं?
हे कसले न्याय?
यंदा तर परिस्थिती अजून गंमतीदार!
VIP लोकांचा सगळा थाटमाट, मीडिया फ्लॅश, मोठमोठे देणग्या…
पण जेव्हा समुद्राच्या लाटांमध्ये बाप्पाची मूर्ती हलली, तेव्हा ती बचवायला कोणी VIP धावून आलं का?
नाही.
तेव्हा पुन्हा धावले ते मूळ घराणे माझे कोळी बांधव!
शेकडो हातांनी, छातीवर लाटा झेलत, बाप्पाला सुरक्षित विसर्जन करून दाखवलं.
मग खरा VIP कोण?
श्रीमंत की ते मच्छीमार जे बाप्पाच्या सेवेत जीव धोक्यात घालतात?
आज सोशल मीडियावर संदेश फिरतोय —
“लालबागचा राजा मंडळावर नाराज आहे.
कोळी समाजाला दर्शन नाही दिलं, पण शेवटी विसर्जनालाच कोळ्यांना धावून जावं लागलं.”
हा केवळ मेसेज नाही, हा भक्तांच्या मनातला जळजळीत संताप आहे.
कारण बाप्पा हा ना VIP ना खासदारांचा,
तो आहे सर्वांचा.
लालबागचा राजा मंडळाने हा आवाज ऐकला पाहिजे.
VIP संस्कृतीचा थाट बंद केला नाही, तर लोकांचा विश्वास ढासळेल.
बाप्पा कोणी एका वर्गाचा खासगी मालमत्ता नाही.
त्याला VIP गल्लीत अडकवू नका.
त्याचं खऱ्या अर्थाने विसर्जन करायचं असेल तर सर्वसामान्य भक्तांच्या डोळ्यांतून त्याला उतरू द्या.
आज लालबागचा राजा हा कोळी समाजाचा, गिरणीकामगारांचा, मुंबईकरांचा अभिमान आहे.
त्याचं दर्शन घ्यायचं हक्काने, समानतेने
हे मंडळाने विसरू नये.
नाहीतर लोक विचारायला मागे हटणार नाहीत
बाप्पा VIP चा की सर्वसामान्यांचा?