रोजच्या राहाटगाडग्यात विस्मृतीत गेलेला ‘शानू’… कपाटाचा दरवाजा पायावर पडून शहानवाज करिम अत्तार महिनाभरापासून ग्रामपंचायतीत येऊ शकला नाही
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर — ११ मार्च २०२६

ग्रामपंचायतीतील कपाटाचा जड दरवाजा पायावर पडून पायाला फ्रॅक्चर झाल्याने नेहमी गडबड-गोंधळ करत वातावरण जिवंत ठेवणारे शहानवाज करिम अत्तार उर्फ ‘शानू’ गेल्या सुमारे महिनाभरापासून ग्रामपंचायतीच्या कामावर येऊ शकला नाही. त्यामुळे रोज आवाज आणि गडबडीने भरलेले ग्रामपंचायतीचे वातावरण सध्या काहीसे शांत झाल्याचे चित्र दिसत आहे.सतत बोलत राहणारा , तोंडाची गडबड करत सर्वांना हसवत ठेवणारा शानू अचानक दिसेनासे झाल्याने ग्रामपंचायतीत एक वेगळीच पोकळी निर्माण झाली आहे. काहीजण अजूनही त्याची आठवण काढतात; पण बऱ्याच जणांच्या रोजच्या राहाटगाडग्यात शानू मात्र जणू विस्मृतीतच गेला आहे, अशीही भावना व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, शहानवाज करिम अत्तार यानि यापूर्वी कधीही इतका मोठा आजार किंवा दुखापत अनुभवली नव्हती. नेहमी धावपळीत राहणारे आणि कधीही घरात न बसणारा शानू सध्या या दुखापतीमुळे घरातच राहण्यास मजबूर झाले आहेत. रोज लोकांमध्ये वावरण्याची सवय असलेल्या शानूला आपल्या रोज भेटणाऱ्या माणसांना भेटण्यासाठीही व्याकुळ व्हावे लागत असल्याचे जवळच्या लोकांकडून सांगितले जात आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनात रोजच्या राहाटगाडग्यात आपल्या बाजूला काम करणाऱ्या माणसालाच विसरण्याची सवय आपल्याला लागली आहे. माणूस रोज नजरेसमोर काम करत असतो, तेव्हा त्याची फारशी दखल घेतली जात नाही; पण तोच माणूस काही दिवस दिसेनासा झाला की त्याची आठवण आणि त्याची किंमत जाणवायला लागते.
दरम्यान, ‘छावा’च्या माध्यमातून या पवित्र रमजान महिन्यात अल्लाहकडे एकच प्रार्थना शहानवाज करिम अत्तार लवकरात लवकर पूर्ण बरे व्हावेत आणि पुन्हा ग्रामपंचायतीत त्यांचा गोंगाट, त्यांची धावपळ आणि त्यांची उपस्थिती पूर्वीसारखी दिसावी.
कारण… माणूस रोज दिसत असतो तेव्हा त्याची किंमत कळत नाही; पण तोच माणूस दिसेनासा झाला की त्याची उणीव जाणवते.
![]()




