रेवदंड्यात व्होडाफोन व आयडिया (Vi) नेटवर्क ठप्प
ग्राहक, व्यापारी, विद्यार्थी सर्व हैराण – मोबाईल संपर्क, इंटरनेट, ऑनलाइन कॅश ट्रान्सफर कोलमडले
छावा डिजिटल न्यूज पोर्टल सचिन मयेकर रेवदंडा शुक्रवार २६ सप्टेंबर २०२५
रेवदंडा : आज सकाळी साधारण सात वाजल्यापासून व्होडाफोन व आयडिया (Vi) कंपनीचे टॉवर अचानक डाऊन झाले टेक्निकल इश्यू झाला असून संपूर्ण रेवदंडा व परिसरात मोबाईल नेटवर्क पूर्ण ठप्प झाले आहे.
मोबाईल सेवा गायब कॉल्स लागत नाहीत, इंटरनेट सुरू होत नाही, जीपीएस वापरता येत नाही.
व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान – UPI, GPay, PhonePe सारखे ऑनलाइन कॅश ट्रान्सफर थांबले, बँकिंग व ऑनलाइन व्यवहार ठप्प.
ग्रामस्थ व व्यापाऱ्यांचे हाल – अचानक नेटवर्क ठप्प झाल्याने ग्रामस्थांपासून व्यापाऱ्यांपर्यंत सर्वच वर्ग हैराण.
विद्यार्थ्यांची घालमेल – ऑनलाईन क्लासेस व अभ्यासासाठी लागणारे इंटरनेट बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान.
या संपूर्ण “नेटवर्क आउटेज” बाबत सूत्रांकडून समजते की सेवा दुपारनंतर किंवा संध्याकाळपर्यंत सुरू होऊ शकते. तोपर्यंत रेवदंड्यातील नागरिक अक्षरशः हवालदिल झाले आहेत.
![]()

