रेवदंड्यात मानवी कवटीने काढले डोके वर

रेतीबंदर परिसरात आढळला मानवी सापळा

  • परिसरात शंका कुशंकांचे वातावरण
  • पोलिस प्रशासनातर्फे नागरिकांना सौजन्याचे आवाहन

रेवदंडा (विशेष प्रतिनिधी, दि. ३० मे) अलिबाग तालुक्यातील रेवदंडामधील रेती बंदर म्हणून नामख्यात असलेले मोठे बंदर येथील परिसरात मानवी सापळा आढळल्याने शंका – कुशंकांचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रसंगी रेवदंडा पोलीस स्थानकाकडून नागरिकांना सौजन्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

याबाबत सविस्तर हकीगत अशी की, ऐतिहासिक किल्ला असणारा हा परिसर नागरिकांसाठी अल्हाददायक विश्रांतीचा तसेच व्यायाम आणि पाय मोकळे करण्याची जागा आहे. याअनुषंगाने काही नागरिक या परिसरात वावरत असताना त्यांना मानवी कवटी सदृश्य वाळूतून वर आल्याचे जाणवले. कुतूहलापोटी नजीक गेल्यावर वाळूत रुतलेला मानवी सापळा त्यांना आढळला. याबाबतची कल्पना त्यांनी पोलीस पाटील स्वप्निल तांबटकर यांना दिल्यानंतर त्यांनी कर्तव्याभिमुख वर्तन करत अशी फिर्याद रेवंडा पोलीस स्थानक येथे दिली.

याबाबतचा तपास पीएसआय दीपक मशेलकर यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यांनी याबाबत वैधानिक कारवाई पूर्ण केली असून, वैद्यकीय तपासणी सुरू करण्यात आली आहे. मात्र हा सापळा स्त्रीचा किंवा पुरुषाचा आहे, तसेच हा सापळा येथे कुठून आला? आला का कोणी गैरकृत्य करून लपवले? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून, त्याची उत्तरे तपासाअंती मिळणारच आहेत. कारण पुढील कारवाईसाठी पोलिस प्रशासनातर्फे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *