रेवदंड्यात पोलिसांची धडक कारवाई दीड लाखांचा गांजा जप्त. श्वान पथकाची मदत..

रेवदंडा प्रतिनिधी – रेवदंड्यात गांजा अमली पदार्थ बेकायदेशीररित्या विक्री करत असल्याप्रकरणी अर्चना आशिष तळेकर वय वर्ष ४१ तसेच आशिष नंदकुमार तळेकर यांचे वर गुन्हा रजिस्टर नंबर ७३ / १२५ कलम 3 /५ सह.एन.डी.पी.एस.ॲक्ट कलम ८/क २० ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील आरोपी अर्चना आशिष तळेकर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा अलिबाग व रेवदंडा पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने थेरोंडा फाटा रेवदंडा येथे गोपनीय माहितीच्या आधारे हा छापा टाकला असून गांजाचा साठा जप्त करून अर्चना आशिष तळेकर यांना ताब्यात घेतले आहे याप्रकरणी हवलदार भाग्यश्री पाटील यांनी फिर्याद दाखल केली आहे पुढील तपास एस. आर. नंदगावे हे करीत आहेत. या छाप्यांमध्ये एकूण १ लाख ५२ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

2 thoughts on “रेवदंड्यात पोलिसांची धडक कारवाई दीड लाखांचा गांजा जप्त. श्वान पथकाची मदत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *