रेवदंडा समुद्रकिनारी आईच्या नावावर वृक्षारोपण

भारतात एक झाड आईच्या नावाने २.० मोहिमेचा शुभारंभ

रेवदंडा ग्रामपंचायत आस्थापनेकडून नोंदविला सहभाग

वृक्षारोपण करताना ग्रुपग्रामपंचायत रेवदंडा सदस्य प्रीती गोंधळी, ग्रामपंचायत अधिकारी नितेश तेलगे, वरिष्ठ लेखनिक सुभाष मानकर तथा अन्य कर्मचारी

रेवदंडा (प्रतिनिधी, दि.०५ जून) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘एक झाड आईच्या नावाने 2.0’ या केंद्र सरकारच्या प्रेरणादायी उपक्रमांतर्गत रेवदंडा ग्रामपंचायतीच्या वतीने समुद्रकिनारी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाद्वारे पर्यावरण संरक्षणाबरोबरच मातृभक्तीचे प्रतिकात्मक दर्शन घडवण्यात आले.

याप्रसंगी ग्रुप ग्रामपंचायत रेवदंडा सदस्य प्रीती गोंधळी, ग्रामपंचायत अधिकारी नितेश बाळा तेलगे, वरिष्ठ लेखनिक सुभाष मानकर, लिपिक सचिन मयेकर, आसिफ लांबाते संगणक परिचारिका कोमल बंगलेकर ,रवींद्र देवकर तसेच ग्रामपंचायतचे इतर कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. उपस्थितांनी परिसर स्वच्छ ठेवत श्रमदान केले आणि निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला.

कार्यक्रमादरम्यान विविध देशी वृक्षप्रजातींची लागवड करण्यात आली.ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत असून, स्थानिक तरुणांनाही यामधून प्रेरणा मिळत आहे.

“आज #WorldEnvironmentDay च्या निमित्ताने, आपण आपल्या ग्रहाचे संरक्षण करण्यासाठी आपले प्रयत्न अधिक गहिरे करूया आणि आपण सामोरे जात असलेल्या आव्हानांवर मात करूया. मी सर्वांना, विशेषतः आपल्या मातांच्या नावाने झाडे लावण्याचे आवाहन करतो.” :- मा. नरेंद्र दामोदर मोदी, पंतप्रधान

एक झाड आईच्या नावाने” ही संकल्पना निसर्ग व मातृत्व यांची अनोखी सांगड घालणारी असून, समाजात पर्यावरण जागरूकता निर्माण करणारी आहे, आणि नैसर्गिक बांधिलकी आणि मानवी उत्थानाच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” :- मा. नितेश तेलगे, ग्रामपंचायत अधिकारी – रेवदंडा

मातृत्वाशिवाय सारे जग अपूर्ण आहे. निसर्गालाही आपण प्रकृती स्वरूपात मातृत्व भावाने अनादी काळापासून जपत आलो आहोत. निसर्गाच्या जतनासाठी उचललेले हे पाऊल निश्चितच सकारात्मक बदलाची सुरुवात आहे आणि यासाठी समस्त ग्रामस्थांनी या मोहिमेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन मी लोकप्रतिनिधी या भूमिकेतून करीत आहे. :- प्रीती गोंधळी, ग्रामपंचायत सदस्य – रेवदंडा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *