रेवदंडा येथून मुंबईतील २९ वर्षीय युवती बेपत्ता : पोलिसांचा तपास सुरू
रेवदंडा परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईतील गोरेगाव येथील रहिवासी कुमारी सिद्धी दिलीप काटवी (२९) ही युवती रेवदंडा येथील ब्लॉकवरून रहस्यमयरीत्या बेपत्ता झाली आहे.
सचिन मयेकर”छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल. १६ सप्टेंबर २०२५
नोव्हेंबर २०२४ पासून रेवदंडा येथे राहायला आलेली ही युवती मानसिक अस्वस्थतेमुळे नेहमी चिडचिड करीत असल्याचे सांगितले जाते. दिनांक ६ ऑगस्ट २०२५ रोजी तिचे आई-वडील तिला भेटण्यासाठी आले असता मुलगी ठिकाणी सापडली नाही. त्यातच तिचा मोबाईलदेखील बंद असल्याने ती हरविल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर तिचे वडील दिलीप चंद्रकांत काटवी यांनी रेवदंडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून मनुष्य मिसिंग रजिस्टर क्र. ११/२०२५ प्रमाणे नोंद झाली आहे. तपासाची सूत्रे पोलीस हवालदार महेंद्र राठोड यांच्याकडे आहेत.
बेपत्ता युवतीचे वर्णन :
रंग : निमगोरा
उंची : ५ फूट
बांधा : सडपातळ
पोशाख : मरून रंगाचा पंजाबी ड्रेस
कानात : आर्टिफिशियल टॉप
पायात : हिलच्या चप्पल

गंभीर बाब अशी की एका तरुणीचा ठावठिकाणा लागलेला नाही आणि महिनाभराहून अधिक काळ उलटूनही तिचा पत्ता लागत नसल्याने परिसरात संभ्रम आणि चिंतेचे वातावरण आहे.
छावा तर्फे जनतेला आवाहन
या बेपत्ता मुलीबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास तातडीने रेवदंडा पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा छावाच्या प्रतिनिधींना कळवावे.
आपली एक मुलगी हरवली आहे समाजातील प्रत्येक सजग नागरिकाने तिच्या शोधात मदतीचा हात द्यावा, हेच खरे कर्तव्य आहे.
![]()

