रेवदंडा – भरतीच्या वेळी समुद्राच्या पुळणीत पर्यटकाची चारचाकी अडकली आरोपीवर गुन्हा दाखल

दि. 11/09/2025 रोजी दुपारी 12 वाजता रेवदंडा समुद्रकिनारी एक धोकादायक प्रकार घडला. यश राजेंद्र मेहता (वय 26, रा. मालाड, मुंबई) याने त्याच्या ताब्यातील चारचाकी कार (MH-47-BT-5694) भरतीच्या वेळी समुद्राच्या पुळणीत चालवून नेली.

सचिन मयेकर, ‘छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल. ११ सप्टेंबर २०२५

या बेफिकीर कृतीमुळे समुद्रकिनारी पायी फिरणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला. भरतीचे पाणी व वाळूमुळे ही चारचाकी पुळणीत रुतून राहिली. त्यामुळे स्वतः चालकाच्याही जीविताला धोका निर्माण झाला.

सदर घटनेची माहिती मिळताच रेवदंडा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने JSB च्या साहाय्याने ही चारचाकी पाण्यातून सुखरूप किनाऱ्यावर बाहेर काढली.

सदर प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नंबर 113/2025 प्रमाणे यश राजेंद्र मेहता याच्याविरुद्ध BNS 125 व MV Act 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि किरवले यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल गव्हाणे करीत आहेत.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *