रेवदंडा पोलीस ठाण्यात माविम व पोलीस यांची संयुक्त बैठक; महिला सक्षमीकरणावर भर

 आर्थिक विकास महामंडळ (माविम) अंगीकृत ओम साई प्रेरणा लोकसंचालित साधन केंद्र अंतर्गत आज रेवदंडा पोलीस स्टेशन येथे पोलीस व माविम मित्र मंडळाची संयुक्त बैठक उत्साहात पार पडली.

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर, रेवदंडा ,शनिवार २८ मार्च २०२६

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर माविमची प्रार्थना घेण्यात आली.

यावेळी रेवदंडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. भैरू किसन जाधव, महिला पोलीस हवालदार संजीवनी अनंत म्हात्रे, विधी सेवा प्राधिकरण स्वयंसेवक सौ. वैशाली किसन वाघमारे, व्यवस्थापक शमीम चौधरी, सुनेत्रा सूर्यकांत भुर्के (CMRC कोषाध्यक्ष), शलाका सतीश राऊत (महिला दक्षता समिती व CMRC उपाध्यक्ष), कायदासाथी प्रशिक्षणार्थी सौ. प्राची प्रशांत जोमराज, संगिता पाटील सहयोगिनी तसेच चौल, रेवदंडा, भोवाळे, बोर्ली, रामराज, महान, नांगरवाडी व बागमळा येथील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविकात शमीम चौधरी यांनी माविमची संकल्पना व महिला सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांनी आपत्कालीन परिस्थितीत कोणत्या क्रमांकावर संपर्क साधावा, तसेच पोलिसांकडून मिळणाऱ्या मदतीबाबत मार्गदर्शन केले व नागरिकांना नेहमी सहकार्याचे आश्वासन दिले.

महिला पोलीस हवालदार संजीवनी म्हात्रे यांनी महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन केले, तर विधी सेवा प्राधिकरणाच्या सौ. वैशाली वाघमारे यांनी विविध शासकीय योजनांची माहिती दिली.

यावेळी सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक तथा माजी ACP (ठाणे वाहतूक शाखा) श्री. रमेश लक्ष्मण धाटावकर (रेवदंडा) व सेवानिवृत्त शिक्षक श्री. प्रकाश प्रभाकर पाटील (सागमळा, चौल) यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *