रेवदंडा पोलीस ठाण्यात – गायत्री जैन हरविल्याची तक्रार

रेवदंडा पोलीस ठाण्यात मिसिंग म्हणून नोंद दाखल

      शोध चालू 

छावा दि. २१ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर)

रेवदंडा पोलीस ठाण्यात मनुष्य मिसिंग रजिस्टर क्रमांक 10/2025 अन्वये सौ. गायत्री रिकेश जैन (वय 37 वर्षे, रा. सालाव, ता. मुरुड) या महिलेबाबत हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 16 जुलै 2025 रोजी सायंकाळी चारच्या सुमारास, गायत्री जैन या आपल्या घरून “दळण आणायला जात आहे” असे सांगून बाहेर पडल्या. मात्र त्यानंतर त्या घरी परत आलेल्या नाहीत. कुटुंबीयांनी नातेवाईक, परिचित, आजूबाजूचा परिसर अशा सर्व ठिकाणी शोध घेतला, पण त्या अद्यापपर्यंत सापडल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली आहे.

हरविलेल्या महिलेचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे:
बांधा: सडपातळ
उंची: 155 सेमी
रंग: सावळा
वेषभूषा: गुलाबी रंगाची साडी व पिवळ्या रंगाचा ब्लाऊज

महत्वाचे म्हणजे, सौ. गायत्री जैन या मानसिक आजाराने ग्रस्त असून, यापूर्वीदेखील त्या अशाच प्रकारे घरातून अचानक निघून गेल्याची नोंद आहे, अशी माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली आहे.

तरी नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणालाही सदर महिला दिसल्यास किंवा त्यांच्याविषयी कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ रेवदंडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

सदर मिसिंग प्रकरणाचा तपास महिला पोलीस हवालदार शिला ठाकूर करत आहेत.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *