रेवदंडा पागार मोहल्ल्यात भावूक क्षण — माजी सरपंच जुलेखा तांडेल यांच्या हस्ते ध्वजारोहण
दिनांक : १५ ऑगस्ट २०२५
रेवदंडा – सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल
रेवदंडा पागार मोहल्ला येथील रायगड जिल्हा परिषद उर्दू शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहणाचा मान यंदा माजी सरपंच सौ. जुलेखा अब्बास तांडेल यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी वातावरण भावनिक झाले. सुमारे ३० वर्षांपूर्वी रेवदंडा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कार्यरत असलेल्या सौ. जुलेखा तांडेल यांनी आपल्या कारकिर्दीत प्रामाणिक व मोलाचे कार्य करून गावकऱ्यांची मने जिंकली होती. त्या काळी ग्रामपंचायत आणि ऐतिहासिक किल्ल्यावर ध्वजारोहण करण्याचा मान त्यांना मिळायचा.
आज इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा ध्वजारोहण करण्याची संधी मिळाल्याने त्या जुन्या आठवणीत हरवून गेल्या आणि डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले. ही माझ्यासाठी केवळ एक मानाची गोष्ट नाही, तर गावाच्या प्रेमाची आणि सन्मानाची पावती आहे, अशा शब्दांत त्यांनी आपला भावूक अनुभव व्यक्त केला.
ध्वजारोहणाचा मान दिल्याबद्दल त्यांनी रेवदंडा ग्रामपंचायत सरपंच प्रफुल्ल यशवंत मोरे, उपसरपंच मंदा बळी तसेच ग्रामपंचायत सदस्य यांचे मनःपूर्वक आभार मानले. उपस्थित ग्रामस्थांनी त्यांच्या कार्याची आणि गावासाठी दिलेल्या योगदानाची पुन्हा एकदा उजळणी करत त्यांचे अभिनंदन केले.
![]()

