रेवदंडा ग्रामपंचायतीची ग्रामसभा: प्रश्नांची सरबत्ती, उपायांची हमी – जनतेचा आवाज बुलंद..
रेवदंडा ग्रामपंचायतीची ग्रामसभा माननीय बच्चूभाई मुकादम सभागृहात सरपंच प्रफुल्ल यशवंत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. नव्याने रुजू झालेले ग्रामअधिकारी सुदेश यशवंत राऊत यांनी ग्रामस्थांशी ओळख करून दिली.ग्रामस्थांनी आरोग्य, पायाभूत सुविधा, मच्छी मार्केट, जमीन नोंदी , स्वच्छता, वीजपुरवठा, तसेच विविध शासकीय योजनांबद्दल मुद्देसूद प्रश्न ग्रामसभेमध्ये मांडले.
छावा डिजिटल न्यूज पोर्टल —सचिन मयेकर —रेवदंडा शनिवार – १५ नोव्हेंबर २०२५
फिल्टर प्लांटजवळ सदनिकेचे सांडपाणी रस्त्यावर दुर्गंधी, आरोग्य धोक्यात
ग्रामसभेत रेवदंडा कोळीवाडा येथील ग्रामस्थ सचिन पाटील यांनी गंभीर मुद्दा मांडला
मारुती आळीतील पंचायतीचा फिल्टर प्लांट आहे तेथे हरेश्र्वर मैदानावर जाणाऱ्या मार्गावर असणाऱ्या सदनिकेमधील गटाराची टाकी वर्षानुवर्षे फुटलेली आहें आणि सर्व घाण रस्त्यावर वाहते, दुर्गंधी पसरून नागरिक त्रस्त झालेले आहेत तेथे पाणी भरायला जाण्याची सुद्धा घाण वाटते
तात्काळ कारवाईची मागणी केली.
कृषी पंचनामे – मुदत संपत आली, शेती नुकसानावर तातडीचा भर
ग्रामअधिकारी यांनी स्पष्ट केले की शेतीच्या पंचनाम्याची मुदत संपत आली असून दोन दिवसांत कृषी विभागाशी संपर्क न केल्यास नुकसानभरपाई प्रक्रियेत अडचणी येऊ शकतात.
सरपंच प्रफुल्ल मोरे म्हणाले, समुद्रकिनारी प्रचंड चिखल साचल्याने मच्छीचा दुष्काळ निर्माण झाला आहे. परिस्थिती गंभीर असून मच्छी दुष्काळ’ जाहीर करण्याची वेळ आली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रावर प्रश्नांचा भडीमार.
महिला ग्रामसभेत पीएचसीवरील डॉक्टर दुपारी गैरहजर असल्याची तक्रार करण्यात आली. यावर डॉक्टरांनी स्पष्टीकरण देताना सांगितले
OPD दुपारी 12 पर्यंत असली तरी डॉक्टर 2 वाजेपर्यंत थांबतात, गैरहजेरीचे आरोप चुकीचे आहेत.
डोळ्याला झालेल्या जखमेबाबत हर्षल घरत यांनी असा प्रश्न मांडला की उपचार प्राथमिक केंद्रात मिळाले नाहीत तर मग माय उपयोग. उपचार न मिळाल्याच्या आरोपावर डॉक्टरांनी सांगितले डोळ्याची जखम नाजूक असते. स्पेशालिस्टकडेच उपचार होतात म्हणून पुढील ठिकाण रेफर केले.
रंजना उमते यांनी घसा-खोकल्यावर औषध न मिळाल्याच्या तक्रारीवर उत्तर देताना डॉक्टरांनी उपदेश केला
घरीच औषध ठरवून येऊ नका. निदान डॉक्टरांना करू द्या.
रवींद्र चौलकर यांनी औषधांचा तुटवडा असल्याचे सांगितले.
मधुकर गायकवाड यांनी विचारले की हॉस्पिटल फंड ग्रामपंचायतीतून येतो का?
यावर ग्रामअधिकारी यांनी सांगितले—फंड नसला तरी आवश्यकतेनुसार पत्र दिल्यास पंचायत थोडी फार मदत करू.
सरपंच म्हणाले की प्राथमिक केंद्राची परिसराची स्वच्छता होणे गरजेचे आहें.
त्यावर ग्रामधिकारी म्हणाले बाहेरचीच नव्हे तर आपला घर परिसरही स्वच्छ ठेवणे आपली जबाबदारी आहे.
कुष्ठरोग सर्वे, HPV लस, आयुष्यमान भारत आरोग्यविषयक घोषणांची मालिका
17नोव्हेंबरपासून कुष्ठरोग सर्वे होणार आहें.
HPV लस – 14–15 वर्षांच्या मुलींसाठी, गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून बचावासाठी सर्वे सुरु होणार असल्याचे प्राथमिक डॉक्टर यांनी सांगितले.
आयुष्यमान भारत ग्रामसेवकांनी विचारले की 100% सर्व्हे झाले आहे का? नसेल तर कॅम्प लावण्यात येईल, 5 लाखांचा मेडिकल क्लेम सर्व पात्रांना मिळू शकतो.
मच्छी मार्केटमध्ये खळबळ बाहेरून आणलेली मच्छी बंद करा.
मच्छी विक्रेत्या महिलांनी मोठ्या आवाजात मुद्दे मांडले
पेट्या ठेवायला जागा द्यावी
सध्याच्या जागेऐवजी जुन्या मार्केट जागेची मागणी
बाहेरून विकत घेतलेली मच्छी विकण्यास मज्जाव करावा अशी तक्रार मच्छीविक्रेत्यांनी
महिलांनी मांडली.
यावर ग्रामअधिकारी म्हणाले
धंदा करण्याचा अधिकार सर्वांना संविधानाने दिला आहे. परंतु जागा आरक्षित असेल तरच विक्री.
ग्रामसभेचा अखेरचा निर्णय:
स्वतःच्या बोटीतली मच्छी विकण्यास हरकत नाही; पण बाहेरून विकत घेतलेली मच्छी रेवदंड्यात विकता येणार नाही.
जमीन नोंदीचा मोठा प्रश्न एक एकर प्लॉट कुणाच्या नावावर?
मधुकर गायकवाड व ग्रामस्थ यांनी मुद्दा मांडत विचारले की
पंचशील नगर दलित वस्ती येथे लागून असलेली ८५ एकर जमीन आहें त्यातील ग्रामपंचायतिचे नावे असलेला एक एकरचा ७/१२ त्याच्यावर काही लोकांनी अतिक्रमण झाले आहें. ती जागा काढून घ्यावी व तिथे असणारा गावठाण गायब कसा झाला असा सवाल ग्रामस्थांनी केला.
ग्रामअधिकारी यांनी सांगितले:
प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे जाईल त्यानंतर भूमिलेख विभागाकडून तपासणी, पंचायतीच्या नावाचा प्लॉट संरक्षित करणे आवश्यक
राजेंद्रकुमार वाडकर म्हणाले कि फुकट मोजणी नको, पंचायतने फी भरून मोजणी करून घ्यावी.
घरे दुरुस्ती, बांधकाम झाले असल्याने फेरआकारणी आवश्यक असल्याचा मुद्दा मांडला त्यावर
ग्रामअधिकारी यांनी उत्तर दिले आचारसंहितेमुळे सध्या शक्य नाही.
ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केला पंचायतचा लँडलाईन नंबर नाही?
ग्रामअधिकारी यांनी सांगितले की BSNL कनेक्शन असेल तर तोच जुना लँड लाईन लगेच चालू करू नसेल तर दुसरा चालू करू.
टॉयलेट पाडण्याची मागणी
कुंभार आळी समोरील जुने टॉयलेट पाडून नवीन बांधण्याची मागणी हर्षल घरत यांनी मांडली.
ग्रामसेवक: सरकारी मालमत्ता डायरेक्ट पाडता येत नाही. इंजिनीअरचे प्रमाणपत्र घेऊन करू.
रेवदंडा मोठे बंदर ते संपूर्ण समुद्रकिनारा – हॅलोजन लाईटची मागणी
विक्रम सुर्वे यांनी सांगितल—पर्यटनासाठी आणि सुरक्षिततेसाठी लाईट लावणे अत्यावश्यक.
समारोप: ग्रामसभेत जनतेची चेतना जागी.
शेती, आरोग्य, स्वच्छता, पायाभूत सुविधा, जमीन, मच्छी व्यवसाय, पर्यटन… सर्वच प्रश्नांवर ग्रामस्थांनी जोरकस चर्चा केली.
![]()

