रेवदंडा ग्रामपंचायतमध्ये बदलाचा वारा — ग्रामअधिकारी सुदेश राऊत यांची धडाडी! रात्री उशिरापर्यंत काम, चार वर्षांपासून त्रस्त वृद्ध नागरिकाने दिलं आभारपत्र.
छावा डिजिटल न्यूज पोर्टल — अलिबाग प्रतिनिधी — शुक्रवार –०७ नोव्हेंबर २०२५
तुम्ही देवदूतासारखे धावलात साहेब ७४ वर्षांच्या वृद्धाचे डोळे पाणावले.रेवदंडा ग्रामपंचायतीत सध्या बदलाची नवी पहाट उगवली आहे.एकेकाळी नागरिकांना माहिती अधिकारासाठी महिनोंमहिने फिरावं लागायचं, पण आता तिथे अधिकारी स्वतः नागरिकांच्या हक्कासाठी धावताना दिसतात.ही क्रांती घडवली आहे ग्रामअधिकारी सुदेश यशवंत राऊत यांनी.गावात चर्चा आहे की त्यांनी फक्त आपली जबाबदारी स्वीकारली नाही, तर जनतेवरचा विश्वास परत आणण्याची शपथ घेतली आहे.रात्री सातपर्यंत कार्यालय खुलं आजच तुमचा पेपर मिळेल.डोंबिवलीत राहणारे प्रकाश काशिनाथ पाटील (वय ७४) यांनी चार वर्षांपूर्वी माहिती अधिकारातून आपली मालमत्ता संबंधित माहिती मागवली होती.त्यांच्या असंख्य अर्जांना उत्तर मिळालं नव्हतं.अनेकदा ग्रामपंचायतीच्या फेऱ्या मारूनही त्यांना निराशा मिळाली.मात्र दि. २४ ऑक्टोबर २०२५ या दिवशी त्यांचं आयुष्य बदललं सुदेश राऊत यांनी त्यांना स्वतः बोलावून घेतलं, आदराने बसवून घेतलं आणि म्हणाले आज आलातच आहात, तर आजच तुमचं काम पूर्ण करतो.त्या दिवशी कार्यालयातील सगळे कर्मचारी कामाला लागले,आणि सायंकाळी सात वाजता पाटील यांच्या हातात माहिती अधिकारातील कागदपत्रं होती.भावनिक आभारपत्राने ग्रामपंचायत दुमदुमलीप्रकाश काशिनाथ पाटील यांनी ग्रामधिकारी यांना पत्रात लिहिलं आहे गेल्या तीन-चार वर्षांत माझं एकही पत्र ऐकलं गेलं नाही.पण तुम्ही देवदूतासारखे धावलात,रात्रीपर्यंत माझं काम केलंत.अशा कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांची समाजाला नितांत गरज आहे.हे पत्र आता ग्रामपंचायतीतच नाही तर संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय बनलं आहे.जुने अर्ज पण थांबणार नाहीत. राऊत यांचा निर्धार. सुदेश राऊत यांनी केवळ नवे अर्जच नव्हे, तर त्यांच्या नियुक्तीपूर्व काळातील सर्व प्रलंबित माहिती अधिकार अर्जांवरही काम सुरू केलं आहे.ही माझ्या काळातील नसली तरी, नागरिकांची मागणी आहे — ती पूर्ण झालीच पाहिजे मग समोरचा आपल्या बरोबर कसाही वागत आहे पण आपण आपली जबाबदारी पुरी करायची असे त्यांचे मत….सध्या तें प्रत्येक अर्जावर स्वतः सहीपूर्व तपासणी करत आहेत.अनेक अर्जदार ज्यांना वर्षानुवर्षे उत्तर मिळालं नव्हतं,त्यांच्यापर्यंत आता उत्तरं आणि समाधान दोन्ही पोहोचू लागलं आहे.धडाडीचे सरपंच प्रफुल्ल मोरे बदलाचा पाया मजबूत करतात. ग्रामपंचायतीचे सरपंच प्रफुल्ल यशवंत मोरे हे स्वतः सुद्धा सर्वांच्या सुखदुःखात धावून जाणारे असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीत कामकाज शिस्तबद्ध झालं आहे.नागरिकांना त्रास नको, काम वेळेवर हवं, हा त्यांचा आदेश प्रत्येक कर्मचाऱ्याला प्रेरणा देतो.रेवदंडा ग्रामपंचायत आज प्रशासनातील जागृत क्रांती’चं प्रतीक बनत आहे.रात्री उशिरापर्यंत पेटलेला दिवा, थकलेला पण संतुष्ट वृद्ध नागरिक, आणि एक अधिकारी जो म्हणतो “उत्तर मिळायलाच हवं, कारण हक्क हा कधीही कालबाह्य होत नाही.
![]()

