रायगड हादरवणाऱ्या मंगेश काळोखे हत्येचा उलगडा — २६ तासांत क्लोज ऑपरेशन नागोठण्यात फिल्मी अटक

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल
✍️ सचिन मयेकर 
📅 रविवार , २८ डिसेंबर २५
रायगड हादरला, खोपोली पेटला, आणि एका हत्येने संपूर्ण जिल्ह्याचे धडधड वाढवलं. नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची भररस्त्यात निर्घृण हत्या, सीसीटीव्ही फुटेज समोर, लोकांत संतापाचा उद्रेक, आंदोलनं, दुकानं बंद, रस्त्यावर रोष, आरोप-प्रत्यारोपांची धग, आणि शहरात तणाव निर्माण. पोलिसांवर तातडीने गुन्हा उकलण्याचा दबाव, पण पोलिसांनी थांबले नाहीत, एकही रात्र विश्रांती नाही, पाठलाग-सापळे-तांत्रिक शोधमोहीम सतत सुरू.
हत्या होताच संशयित गायब, मोबाईल बंद, लोकेशन ऑफ, वाहन बदल, ठिकाणं बदलत पळ, पण पोलिसांच्या नजरांखाली सुटका नाही. SP आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास वेग घेतो, ८ विशेष पथके तैनात, खोपोली, नवी मुंबई, मुंबई एअरपोर्ट, महामार्ग चेकपोस्ट, गावागावात शोध, सीसीटीव्ही ट्रेसिंग, कॉल डेटा स्कॅन, मुखबिर रिपोर्ट, धागे जोडले जातात. तपासाचा वेग इतका प्रखर की आरोपींची पावलं स्वतःच अडकत जातात.
आणि मग सकाळ. नागोठणे परिसर. दोन गाड्यांचा थरारक पाठलाग, रस्ता आडवा, सापळा घट्ट, आरोपींनी पळण्याचा प्रयत्न, दारे धडधड, पण उशीर झाला होता. पोलीस जवळ, हातांवर बेड्या, क्लिक झाल्या, आणि संशयित पोलिसांच्या ताब्यात. पुढील काही तासांत अजून संशयितांचा फेरा पोलिसांत, एकामागोमाग पकड होत गेली आणि एकूण नऊ संशयितांना पोलिसांनी जेरबंद करत रायगडात मोठी कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली.
आता प्रश्न सगळ्यांचा एक हत्या का?
वैयक्तिक वाद? जुने वैर? आर्थिक मतभेद? की अजून खोल राजकीय सावल्या?
पोलिस तपास सुरू आहे, आणि अधिकारी सांगतात की पुढील चौकशीत धक्कादायक दुवे समोर येऊ शकतात, गुन्ह्यामागील संपूर्ण कट, सहभागी नावे व हेतू स्पष्ट होऊ शकतात, अजून चेहरे बाहेर पडण्याची पूर्ण शक्यता आहे. यामुळे रायगडची हवा पुन्हा तापू शकते, पण पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे. तणाव हळूहळू कमी, पण जिज्ञासा जास्त.
दरम्यान या प्रकरणात एका स्थानिक राजकीय नेत्याचे नाव चर्चेत आले, पण त्या नेत्याने  हत्येशी माझा काहीही संबंध नाही, हेतूपुरस्सर ओढले जाते, मी पोलिसांसमोर हजर होऊन सत्य सादर करेन असे प्रतिक्रिया देत आरोप फेटाळले. या वक्तव्यामुळे चर्चेला नवा वळण मिळाले, प्रश्न वाढले  नाव चर्चेत का आले? कोणाला फायदा? खरी साखळी कुठे जोडते? तपासाचे पान कोणत्या दिशेने वळेल?
तपास सुरू, चौकशी तीव्र, आणि शक्यता अनेक.
२६ तासांत हत्या, संताप, पाठलाग, अटक आता पुढील खुलासांची उलटी गणती. रायगड पाहतोय, छावा सांगतोय… ही कथा इथे संपत नाही.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *