रायगड हादरला  म्हसळ्यात संशयास्पद मृत्यूने गाव दणाणलं  घरात सापडले वृद्ध दांपत्याचे कुजलेले मृतदेह पोलिसांचा तपास घरातील मुलावर केंद्रित.

रायगड जिल्ह्याच्या म्हसळा तालुक्यातील मेंदडी कोंड गावात घडलेल्या एका थरकाप उडवणाऱ्या घटनेने जिल्हा हादरला आहे. घरात राहणाऱ्या वृद्ध दांपत्याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. या घटनेमागे कौटुंबिक वाद व घरखर्चाचा ताण कारणीभूत असल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासातून समोर येत आहे. पोलिसांचा संशय सध्या घरात राहणाऱ्या मुलावर केंद्रित आहे.

छावा डिजिटल न्यूज पोर्टल – म्हसळा — सचिन मयेकर सोमवार – ०३ नोव्हेंबर २०२५

मृत व्यक्तींची नावे — महादेव बाळ्या कांबळे (वय ९५) आणि विठाबाई महादेव कांबळे (वय ८३) अशी असून, दोघांचे मृतदेह त्यांच्या घरात कुजलेल्या अवस्थेत आढळले. काही दिवस दांपत्य बाहेर दिसत नसल्याने शेजाऱ्यांनी घरातून येणाऱ्या तीव्र दुर्गंधीची माहिती म्हसळा पोलिसांना दिली. पोलिसांनी घराचे दार उघडले असता बेडवर दोघांचे मृतदेह आढळले.घटनास्थळी फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्कॉड दाखल झाले असून, म्हसळा पोलिस ठाण्याचे पथक पंचनामा करून शवविच्छेदनासाठी दोघांचे मृतदेह पाठवले. प्राथमिक तपासात मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वीचा असल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी घरातील सर्व हालचालींचा तपास सुरू केला असून, घरखर्च आणि वादाच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण उभे राहिल्याचा अंदाज व्यक्त केला जातो.मृत दांपत्याला दोन मुलगे आणि एक मुलगी आहेत. त्यांपैकी एक मुलगा घरातच राहत होता, दुसरा वेगळ्या ठिकाणी स्थायिक आहे, तर मुलगी बाहेरगावी राहते. हीच मुलगी काही दिवस संपर्क न झाल्याने पोलिसांना कळवणारी पहिली व्यक्ती ठरली. सध्या पोलिस चौकशी घरात राहणाऱ्या मुलावर केंद्रित असून, अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.ही घटना १ नोव्हेंबर २०२५ रोजी घडली असून, वृत्त २ नोव्हेंबरला विविध माध्यमांनी प्रसिद्ध केले आहे.म्हसळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल असून, FIR क्रमांक अद्याप सार्वजनिक केलेला नाही.या घटनेने रायगड जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. ग्रामस्थ म्हणतात, ज्यांच्या हातून जन्म झाला, त्यांच्याच मृत्यूची वेळ घरात आली… माणुसकी कुठे हरवलीय? असा हृदयद्रावक सवाल आता गावोगाव विचारला जात आहे.म्हसळा पोलिसांकडून या घटनेचा तपास युद्धपातळीवर सुरू आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल.

‘छावा’ या घटनेवर लक्ष ठेवून असून पुढील सर्व तपशील लवकरच प्रसिद्ध करणार आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *