रायगड पोलिसांचे नागरिकांना आवाहन : २ डिसेंबरला शांततेत मतदान करा
छावा डिजिटल न्यूज पोर्टल ––सचिन मयेकर—शनिवार – २९ नोव्हेंबर २०२५
रायगड जिल्ह्यात २ डिसेंबर २०२५ रोजी नगर परिषद व नगरपंचायत निवडणुका पार पडणार असून, त्याअगोदर जिल्हा पोलिसांनी सर्व मतदारांना एक महत्त्वाचे जाहिर आवाहन केले आहे. हे आवाहन पोलिसांनी त्यांच्या अधिकृत माध्यमातून जाहीर करत नागरिकांना लोकशाही प्रक्रियेत जबाबदारीने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले की
निवडणूक प्रक्रिया शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पाडणे ही पोलिसांची प्राथमिक जबाबदारी आहे.
अफवा, हिंसक वर्तन, धमक्या, जातीचे भेद वाढवणारे संदेश, पैशांचे वाटप, मतदारांना प्रलोभने देणे अशा कोणत्याही बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाई होणार आहे.
समाजमाध्यमांवर किंवा गावामध्ये तणाव निर्माण करणाऱ्या गोष्टी तात्काळ पोलिसांना कळवाव्यात.
नागरिकांनी आचारसंहितेचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे.
तसेच पोलिसांनी प्रत्येक मतदाराला आवाहन केले आहे की—
मतदान हे आपले लोकशाही अधिकार व कर्तव्य आहे. शांततेत, सुरक्षित वातावरणात मतदान करा आणि लोकशाहीला बळ द्या.
पोलीस अधीक्षक, रायगड
![]()

