रायगड जिल्ह्यासाठी हवामान इशारा
• छावा • अलिबाग, दि. ११ जून • प्रतिनिधी
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रायगड जिल्ह्यात येत्या काही दिवसांत पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यानुसार विभागाने खालीलप्रमाणे हवामान इशारे जारी केले आहेत:
🔹 १२ व १३ जून २०२५ (गुरुवार व शुक्रवार) – यलो अलर्ट (Watch – Be Aware)
या दिवशी नागरिकांनी हवामान बदलांची नियमित माहिती घेत राहावी, तसेच आवश्यक ती पूर्वतयारी ठेवावी.
🔸 १४ जून २०२५ (शनिवार) – ऑरेंज अलर्ट (Alert – Be Prepared)
या दिवशी जोरदार पावसाची शक्यता असून प्रशासनाने तसेच नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. शक्य असल्यास घरातच थांबावे, अनावश्यक प्रवास टाळावा, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
हवामान खात्याच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://mausam.imd.gov.in/mumbai/mcdata/district.pdf) अधिक माहिती तपासता येईल.
जिल्हा प्रशासनाकडून सूचना:
-
नदी, नाले, समुद्र किनाऱ्यापासून दूर राहावे.
-
शाळा-कॉलेज प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी.
-
नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माध्यमांवरूनच माहिती घ्यावी.
-
सर्व आपत्कालीन सेवा सज्ज ठेवण्यात आलेल्या आहेत.
सर्व नागरिकांनी सजग राहून प्रशासनास सहकार्य करावे तथा संभाव्य धोक्याची जाणीव ठेवत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेसोबत समन्वय राखावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.