रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेची विक्रमी झेप व्यवसाय 7000 कोटींच्या शिखरावर..

छावा डिजिटल न्यूज पोर्टल ––सचिन मयेकर , अलिबाग रविवार – २३ नोव्हेंबर २०२५

मार्च 2025 च्या तुलनेत तब्बल 1300 कोटींची उडी; डिजिटल बँकिंगमुळे ठेवींमध्ये जोरदार वाढ

राज्यातील सहकारी बँकिंग क्षेत्रात एक नवा मानदंड प्रस्थापित करत रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तब्बल 7000 कोटींचा व्यवसाय टप्पा पार करत आघाडीच्या बँकांमध्ये झळकली आहे.

मार्च 2025 च्या तुलनेत तब्बल 1300 कोटींची घोडदौड, आणि त्यातही सर्वाधिक वाटा ठेवीतील विक्रमी वाढीचा हे यश सध्या आर्थिक वर्तुळात चर्चेचा प्रमुख विषय ठरले आहे.

बँकेने सहामाही कामगिरीत QR कोड, IMPS आणि UPI आधारित व्यवहारांवर जबरदस्त भर दिला.

याचा थेट परिणाम

सेव्हिंग अकाउंटमध्ये मोठी वाढ,

करंट अकाउंट ठेवी सातत्याने चढत्या क्रमावर,

आणि ग्राहकांचा डिजिटल अनुभव अधिक वेगवान व सुरक्षित.

याशिवाय रायगडबाहेरील विश्वस्त संस्था, व्यापारी संघटना, सहकारी सोसायट्या यांनीही मोठ्या प्रमाणावर मुदतठेवींमध्ये गुंतवणूक करून बँकेवरील विश्वास अधोरेखित केला आहे.

 चेअरमन जयंत पाटील यांचे दमदार वक्तव्य

“ही वाढ म्हणजे संपूर्ण रायगडच्या विश्वासाची कमाई! ग्राहक आणि सभासदांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच हा मैलाचा दगड गाठता आला,”

असे चेअरमन जयंत पाटील यांनी अभिमानाने सांगितले.

सायबर सुरक्षा, डिजिटल विस्तार आणि वेगवान व्यवहार – बँक फुल्ल मॉडर्न

मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी सांगितले की

सायबर सुरक्षा अधिक मजबूत,

डिजिटल विस्तार अधिक व्यापक,

आणि ग्रामीण–दुर्गम भागातील नागरिकांचा डिजिटल स्वीकार प्रचंड वेगाने वाढत असल्याने बँकेचे व्यवहार नैसर्गिकरीत्या वरच्या दिशेने जात आहेत.

एनपीए नियंत्रणात – पारदर्शक कर्ज प्रक्रिया

बँकेने एनपीए नियंत्रणावर अक्षरशः झडप घातली असून कर्ज प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता ठेवली आहे.

संचालक मंडळाचा दैनंदिन कारभारातील सक्रिय सहभाग आणि निर्णयक्षम नेतृत्वामुळे बँकेची प्रतिमा आज सक्षम, आधुनिक आणि विश्वासार्ह अशी ओळखली जात आहे.

मंदार वर्तक यांचे प्रभावी मत

ही वाढ फक्त आकड्यांची नाही… ग्रामीण कुटुंबांच्या खऱ्या गरजांना प्रतिसाद देणाऱ्या आमच्या सेवांचा हा विजय आहे. तंत्रज्ञान, ग्राहक सेवा आणि वित्तीय शिस्त या तिन्ही आघाड्यांवर बँक अजून मजबूतपणे कार्य करणार,

असे मंदार वर्तक यांनी नमूद केले.

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा हा 7000 कोटींचा टप्पा केवळ यश नाही, तर राज्यातील सहकारी बँकिंग क्षेत्रासाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.

सातत्याने वाढणारी कामगिरी पाहता, ग्राहकांचा बँकेवरील विश्वास आणखी दृढ होणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *