रायगडात मनसेचा बिग प्लॅन २०२९ निवडणुकांसाठी पायाभरणी, योगेश परुळेकर यांच्याकडे मोठी जबाबदारी
📅 दिनांक: 3१ मार्च २०२६
महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला असून राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी २९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक पुनर्बांधणीला सुरुवात केली आहे. या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये नव्याने संपर्क अध्यक्षांची नेमणूक करण्यात येत असून रायगड जिल्ह्याची जबाबदारी मनसेचे सरचिटणीस योगेश परुळेकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
ही नियुक्ती पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे. राज ठाकरे यांच्या निकटवर्तीय आणि विश्वासू नेतृत्वावर रायगडसारख्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या जिल्ह्याची धुरा देण्यात आल्याने आगामी निवडणुकांसाठी पक्षाची भक्कम पायाभरणी करण्याचा स्पष्ट संदेश दिला गेला आहे.
राजेश बाष्टे — अलिबाग
दरम्यान, आज दि. ३१ मार्च २६ आणि उद्या १ एप्रिल २६ रोजी योगेश परुळेकर रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून या दोन दिवसांत ते जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार आहेत. या दौऱ्यात जिल्ह्यातील पक्षाची सध्याची संघटनात्मक स्थिती, कार्यकर्त्यांची ताकद आणि स्थानिक प्रश्न यांचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे. तसेच पक्षबांधणी अधिक मजबूत करण्यासाठी कोणत्या उपाययोजना राबवायच्या, कार्यकर्त्यांकडून अपेक्षित असलेले काम आणि पुढील रणनीती याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या बैठकीत राज ठाकरे यांच्या विचारसरणीशी सहमत असलेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रायगड जिल्ह्यातील स्थानिक समस्या तसेच पक्षहिताच्या सूचना मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यात मनसेची संघटनात्मक हालचाल पुन्हा वेग घेत असल्याचे या नियुक्तीमुळे स्पष्ट होत असून आगामी काळात जिल्ह्यातील राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
🔸आज दिनांक : ३१ मार्च २०२६
सकाळी ९:०० वा. – दादरहून श्री वरदविनायक गणपती मंदिर, महाड येथे प्रयाण
सकाळी १०:३० वा. – महाड येथे आगमन व दर्शन
सकाळी ११:०० वा. – कर्जत, खालापूर, पेण व सुधागड तालुका पदाधिकारी बैठक (हॉटेल रुशीवन)
दुपारी २:०० वा. – पाली येथे श्री बल्लाळेश्वर गणपती दर्शनासाठी प्रयाण
दुपारी २:३० वा. – भोजन (हॉटेल लँडमार्क)
दुपारी ३:०० वा. – पाली येथे आगमन व दर्शन
सायंकाळी ४:०० वा. – महाड, पोलादपूर, माणगाव, श्रीवर्धन, म्हसला, तळा व रोहा तालुका पदाधिकारी बैठक (माणगाव)
सायंकाळी ६:०० वा. – हॉटेल विसावा, महाड येथे आगमन व मुक्काम
🔸 उद्या दिनांक : १ एप्रिल २०२६
सकाळी ८:०० वा. – किल्ले रायगड दर्शन
सकाळी ११:०० वा. – अलिबागकडे प्रयाण
दुपारी १:३० वा. – भोजन
दुपारी २:०० वा. – अलिबाग येथे आगमन व अलिबाग व मुरुड तालुका पदाधिकारी बैठक (अलिबाग)
सायंकाळी ३:३० वा. – पनवेलकडे प्रयाण
सायंकाळी ५:३० वा. – पनवेल व उरण तालुका पदाधिकारी बैठक (उरण शहर)
सायंकाळी ७:०० वा. – पनवेल शहर पदाधिकारी बैठक
रात्री ८:०० वा. – मुंबईकडे प्रयाण
रात्री ९:०० वा. – मुंबई येथे आगमन
![]()

