रायगडाची छोटी हिरकणी शर्विका म्हात्रे हिचा दिल्लीच्या आग्रा किल्ल्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते सन्मान…..
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल✍ राजेश बाष्टे, अलिबाग | रायगड📅 शुक्रवार | २० फेब्रुवारी २०२६
रायगड भूषण शर्विकाची पुन्हा एकदा उंच भरारी
दिल्ली येथील आग्रा किल्ल्यावर शिवजयंतीच्या पवित्र सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते सन्मान राज्यभरामध्ये शिवजयंतीचा जल्लोष सुरू असताना रायगड जिल्ह्यासाठी आणि अलिबाग तालुक्यासाठी एक अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. अलिबागची कन्या आणि महाराष्ट्राची छोटी हिरकणी म्हणून ओळख असलेली शर्विका म्हात्रे हिचा महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आग्रा किल्ल्यावर सन्मान करण्यात आला आहे. शर्विकाने आत्तापर्यंत महाराष्ट्रातील तब्बल १६५ दुर्ग सर केले असून सध्या ती पुणे येथे वॉल क्लाइंबिंग या खेळाचे प्रशिक्षण घेत आहे. तिच्या या कार्यामुळे तिला आत्तापर्यंत अनेक पुरस्कार परत झाले असून विविध रेकॉर्ड बुक मध्ये तिची नोंद यापूर्वीच झालेली आहे.
छत्रपती संभाजी नगरचे श्री विनोद पाटील हे अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान आणि आर.आर. फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून गेली काही वर्षे दिल्लीच्या आग्रा किल्ल्यावर शिवजयंती साजरी करत आहेत त्या निमित्ताने देशभरातून असंख्य शिवभक्त या सोहळ्यासाठी उपस्थित राहत असतात.
ज्याठिकाणी हिंदूनृसिंह छत्रपती शिवाजी महाराज यांनी क्रूरकर्मा औरंगजेबासमोर रणगर्जना केली…
ज्या ठिकाणाहून संपूर्ण जगाला शिवप्रतापाचे दर्शन घडले…
जिथून शिवरायांनी गरुडझेप घेतली…
त्याच आग्रा किल्ल्याच्या प्रांगणात शिवरायांचा जन्मोत्सव साजरा करण्याची सुरुवात आपल्या सरकारने केली.हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री आदरणीय सी. आर. पाटीलजी, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार, उत्तर प्रदेशचे मंत्री योगेंद्र उपाध्याय, अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
रायगडाच्या लेकीने अवघ्या आठव्या वर्षातच आपल्या कामगिरीने जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे नाव देशभरात नेले आहे. त्यामुळेच देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
![]()

