रायगडमध्ये पुढील पाच दिवस पावसाचा इशारा – नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

रायगड जिल्ह्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. कोकणातील पावसाळी स्थिती अधिक तीव्र होत असून २० ऑगस्टपासून २४ ऑगस्टपर्यंत रायगडमध्ये सतत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल

२० ऑगस्ट २५

हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज म्हणजे २० ऑगस्ट रोजी रायगडमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस कोसळणार आहे. हीच स्थिती २१, २२, २३ आणि २४ ऑगस्ट रोजी देखील कायम राहणार असून त्या काळात अलगद ठिकाणी मुसळधार सरी कोसळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. सलग पावसामुळे नद्या-ओढ्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊ शकते तर डोंगराळ भागात भूस्खलनाचा धोका कायम आहे.

किनारपट्टीवर भरती-ओहोटीच्या वेळी समुद्र खवळलेला राहील त्यामुळे मासेमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरडप्रवण भागात राहणाऱ्या ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच ओढे-नाले आणि लहान पुलांवरून प्रवास करताना दक्षता घेण्याचेही सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

रायगडमध्ये मागील काही दिवसांपासूनच मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून काही गावांचा संपर्क तुटण्याचीही शक्यता आहे. आधीच प्रशासन सज्ज असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की रायगड जिल्ह्यात पाऊस सुरूच राहणार असून नागरिकांनी खबरदारी घेणे अत्यावश्यक

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *