रायगडमध्ये दोन महिन्यांसाठी ड्रोन वापरावर बंदी

रायगड जिल्ह्यातील संवेदनशील भागांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, दहशतवादी किंवा गुन्हेगारी कारवायांना आळा बसावा यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी महत्त्वाचा आदेश काढला आहे.
सचिन मयेकर,‘छावा’ पोर्टल २९ ऑगस्ट २०२५
पुढील दोन महिने पोलीस अधीक्षक रायगड यांच्या कार्यक्षेत्रात कोणत्याही प्रकारचा ड्रोन कॅमेर्याचा वापर करण्यास पूर्वपरवानगीशिवाय सक्त मनाई करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षकांच्या अहवालानुसार,
धार्मिक स्थळे, धरणे, केंद्रीय संस्था आणि समुद्रालगतचे भाग हे अत्यंत संवेदनशील मानले गेले आहेत.
काही ठिकाणी रात्री अनधिकृत ड्रोन उडवल्याच्या तक्रारी आल्या असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
देशभरातील पूर्वीच्या घटनांप्रमाणे, ड्रोनद्वारे टेहळणी करून दहशतवादी कारवाया किंवा चोरीसारखे गुन्हे घडण्याची शक्यता आहे.
ड्रोन वापरायचा असल्यास, व्यक्ती, संस्था वा आयोजकांनी किमान ७ दिवस आधी स्थानिक पोलीस ठाण्यात माहिती देऊन परवानगी घेणे अनिवार्य आहे, असे आदेशात स्पष्ट क
रण्यात आले आहे.