राज्याभिषेक एक दिवसाचा… पण संघर्ष अखंड – संभाजी महाराज

  • छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल
  • ✍️ सचिन मयेकर
  • 📅 शनिवार , १७ जानेवारी २६

इतिहासातील नोंदी, बखरी, अभ्यासकांचे संशोधन, आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीवरील उपलब्ध दस्तऐवज यांच्या आधारे हा लेख मांडण्यात आला आहे. हा लेख व्यक्ती किंवा समाजावर आरोप करण्यासाठी नव्हे, तर त्या काळातील परिस्थिती समजून घेण्यासाठी आहे.

आज प्रत्यक्ष राज्याभिषेक नाही पण आज त्या इतिहासाची आठवण आहे ज्या इतिहासात सत्ता सहज मिळाली नाही तर संघर्षातून हिसकावली गेली काल लोकांनी व्हॉट्सॲप स्टेटस ठेवले फोटो बदलले जयघोष केले आणि पुढच्या दिवसात गेले पण इतिहास तिथेच थांबला नाही कारण राज्याभिषेक हा शेवट नव्हता तो तर सुरुवात होती ज्या क्षणाला छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याच्या गादीवर आले त्या क्षणापासून खरी लढाई सुरू झाली कारण बाहेर मुघलांचा दबाव होता आणि आत स्वतःचीच माणसं विरोधात होती स्वराज्यातच कुजबुज सुरू होती नातलगांचे कट होते गादीकडे डोळा ठेवणारे चेहरे होते काहींना राजा कठोर वाटत होता काहींना धोकादायक वाटत होता तर काहींना स्वतःची सत्ता जात असल्याची भीती होती म्हणून संशय पसरवले गेले नात्यांचा वापर दबावासाठी झाला आणि राज्याभिषेकच होऊ नये यासाठी आतून हालचाली झाल्या पण या सगळ्यांच्या मध्यात संभाजी महाराज डगमगले नाहीत कारण हा प्रश्न सत्तेचा नव्हता हा प्रश्न स्वराज्याच्या अस्तित्वाचा होता शत्रू बाहेर असेल तर तलवारीने उत्तर देता येतं पण शत्रू स्वतःचा असेल तर मनगटात जास्त ताकद लागते आणि ती ताकद संभाजी महाराजांनी दाखवली राज्याभिषेक झाल्यावर त्यांनी आराम निवडला नाही सोहळ्याच्या सावलीत लपून राहिले नाहीत त्यांनी पहिल्याच दिवसापासून निर्णय घ्यायला सुरुवात केली सर्वात आधी दरबारातली दुटप्पी भूमिका संपवली आदेश न पाळणाऱ्यांना मोकळीक नाही हे स्पष्ट केलं कारण स्वराज्य बाहेरून जितकं धोक्यात होतं तितकंच आतूनही असुरक्षित होतं त्यानंतर मुघलांबाबत स्पष्ट भूमिका घेतली औरंगजेबाशी तडजोड नाही तह नाही वेळकाढूपणा नाही स्वराज्य झुकणार नाही हा संदेश शब्दात नव्हे तर भूमिकेतून दिला गेला पुढचा ठोस निर्णय लष्करी सज्जतेचा होता किल्ले मजबूत करण्याचे आदेश दिले सीमांवर लक्ष वाढवलं सैन्य सतत हालचालीत ठेवलं कारण स्थिर राहणं म्हणजे शत्रूला संधी देणं हे धोरण त्यांनी नाकारलं स्वराज्य आता केवळ बचावात्मक राहणार नाही तर संधी मिळताच आक्रमक असेल ही दिशा ठरवली राजा असूनही त्यांनी ऐश्वर्य नाकारलं कारण सत्ता भोग नव्हती ती जबाबदारी होती त्याच वेळी आतल्या फितुरीवर बारीक लक्ष ठेवण्यात आलं विश्वास ठेवला गेला पण आंधळेपणाने नाही माहिती गोळा करण्यात आली निर्णय भावनेवर नाही तर परिणाम पाहून घेतले गेले कारण संभाजी महाराजांसाठी लोकप्रियता महत्त्वाची नव्हती परिणाम महत्त्वाचा होता राज्याभिषेकानंतरचा काळ शांततेचा नव्हता तो तयारीचा होता ही तयारी केवळ लष्करी नव्हती ती मानसिक होती स्वराज्याला संघर्षासाठी तयार करण्याची होती लोकांनी मुकुट पाहिला पण राजाने तलवार उचलली लोकांनी घोषणा केल्या पण राजाने दिशा ठरवली म्हणूनच आज राज्याभिषेकाचा फोटो विसरला जातो पण त्या राज्याभिषेकानंतर घेतलेले निर्णय आजही इतिहासाची दिशा ठरवतात कारण संभाजी महाराजांचा इतिहास एका दिवसाचा नाही तो त्या दिवसानंतर सुरू झालेल्या कठोर निर्णयांचा आहे आणि म्हणूनच हा राजा आजही अस्वस्थ करतो कारण तो साजरा होण्यासाठी नाही तर सर्वांच्या विरोधात उभा राहून स्वराज्य टिकवण्यासाठी जन्मलेला होता 🚩

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *