रविवार विशेष रसदशक्ती…रायगडाचे अदृश्य बुरुज 🚩 शिवरायांच्या गोदामांनी स्वराज्य भुकेवर जिंकले.
छावा डिजिटल न्यूज पोर्टल – सचिन मधुकर मयेकर – रविवार ०७ डिसेंबर २०२५
रायगड म्हणजे मराठा साम्राज्याचे धडधडते हृदय, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुव्यवस्थेचं जागतिक उदाहरण घातलं, कारण युद्ध जिंकायला तलवार महत्वाची असतेच पण अन्नसाठा हाच खरा कणा असतो आणि म्हणूनच रायगडावर महाराजांनी प्रचंड प्रमाणात धान्य, डाळी, तेल, मीठ, गूळ, पाणी यांचा मजबूत साठा तयार केला होता, शत्रूने वेढा घातला तरी पोट रिकामे पडू नये हा छत्रपतींचा आदेश होता, रायगडावर किमान आठ महिन्यांचा रसदसाठा कायम तयार असे आणि त्यामुळे सेनेचा आत्मविश्वास कधी ढळला नाही, गंगा-सागर तलावाजवळ व राजवाड्याच्या खालच्या भागात मोठमोठी कोठारे होती आणि आज दिसणारे अवशेष म्हणजे तेच शिवकाळातील धान्यकोठार, इथूनच शिपाई, घोडे, तोफखाना आणि कारागीर यांची रोजची व्यवस्था सुरळीत चालत असे, कोकणातून रसद येऊन खिंडीमार्गे किल्ल्यावर पोचत असे, कोठारदार नावाचा अधिकारी हिशेब तपासत असे आणि सुरक्षा पक्की ठेवली जात असे कारण शिवशासन म्हणजे शिस्त, जबाबदारी आणि सततची आकस्मिक तयारी, रायगडावरील प्रत्येक दगड सांगतो की प्रजेचे पोट भरले तरच राज्य बळकट होते आणि शिवरायांनी दाखवून दिलं की राजा फक्त सिंहासनावर नसतो तर तो प्रत्येक धान्यात, प्रत्येक पोत्यात, प्रत्येक कणात जिवंत असतो, युद्ध जिंकणारे शूर असतात पण साम्राज्य उभं करणारे सुव्यवस्था घडवतात आणि शिवछत्रपती हे त्या सुव्यवस्थेचे अजेय सम्राट होते, रायगडाची भिंत मजबूत होतीच पण खरी ताकद गोदामशक्तीत होती म्हणूनच रायगड अजिंक्य राहिला, अन्न हेच सामर्थ्य, शिस्त हेच शस्त्र आणि प्रजा हाच केंद्रबिंदू या तत्त्वांवर उभं असलेलं शिवशासन आजही महाराष्ट्राच्या रक्तात धगधगतंय आणि म्हणून रायगड आजही म्हणतो जय भवानी, जय शिवराय.
शिवछत्रपती शिवाजी महाराज अन्नधान्य मुख्यतः कोकणातील शेतकऱ्यांकडून मिळवत असत, कारण कोकण हा तांदूळ इतर अन्यधान्यांसाठी मोठा प्रदेश होता रायगडासह इतर किल्ल्यांवर रसद चढवली जात असे, तसेच पुणे, सातारा, कराड, कोल्हापूर या देशभागातून गहू, ज्वारी, तूरडाळ असा पुरवठाही होत असे, शिवरायांनी कर फक्त पैशात नाही तर धान्यरूपानेही घेण्याची व्यवस्था केली होती ज्याला धान्यकर किंवा रसदकर असे म्हटले जाई, मोठ्या मोहिमांसाठी व्यापाऱ्यांकडून थेट खरेदीही केली जात असे, समुद्रमार्गाने व्यापारी ताफ्यांमधूनही अन्नधान्य येत असे, अनेक किल्ल्यांवर स्वतःची शेती, खाचरे आणि तलाव ठेवून आपत्कालीन उत्पादनाची तयारीही केली होती, हा सगळा साठा गडावरील कोठारांमध्ये सुरक्षित ठेवला जाई आणि त्यासाठी कोठारदार नावाचा अधिकारी मासिक हिशेब तपासत असे, चोरी किंवा अपव्ययाला जागाच नव्हती, शत्रूने वेढा घातला तरी किमान सहा ते आठ महिन्यांचा साठा कायम असे, म्हणूनच शिवरायांची सेना कधी भुकी राहत नसे आणि पोटभर सैनिक रणांगणात वीजेसारखे तुटून पडत असत, युद्ध जिंकणारे शूर असतात पण युद्धात टिकून राहणारे अन्नसाठे असतात हे शिवरायांनी जगाला दाखवून दिले आणि त्यामुळे मराठ्यांचे मनोबल कधीही खालावले नाही जय भवानी जय शिवराय.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात आयुष्याच्या अखेरीपर्यंत सुमारे ३५० ते ३७० किल्ले होते असे इतिहासकार मानतात, या प्रत्येक किल्ल्यावर युद्धात टिकण्यासाठी अन्नसाठा आणि रसदव्यवस्था अत्यंत शिस्तबद्ध होती, कारण शिवरायांची स्पष्ट नीती होती की शत्रूने कितीही वेढा घातला तरी गडावरची सेना भुकी पडणार नाही, यासाठी किल्ल्यांवर मोठी धान्यकोठारे, पाण्यासाठी तलाव-विहिरी, आणि घोड्यांसाठी चारागृह ठेवलेले असे, कोकण व देशभागातून आलेले गहू, ज्वारी, तांदूळ, डाळी, मीठ, गूळ, तेल इत्यादी धान्य कोठारात सुरक्षित साठवले जाई, कोणीही अपव्यय करू नये म्हणून कोठारदार ही स्वतंत्र जबाबदारीची पदवी होती आणि त्याचा मासिक हिशेब घेतला जाई, रसद साठवणीसाठी किल्ल्याच्या भूगोलानुसार कोठारे बांधली जात काही जमिनीत खोल, काही बालेकिल्ल्याजवळ, काही दरवाज्यांच्या नियंत्रणात, शत्रूचा तोफेचा मारा किंवा गुप्त हल्ला झाला तरी साठा वाचावा म्हणून दृढ भिंती, अरुंद प्रवेशद्वार आणि आत संरक्षण व्यवस्था ठेवली जाई, शिवरायांनी कुठल्याही एका मार्गावर अवलंबून राहू नये म्हणून समुद्रमार्ग, घाटमार्ग, गल्लेकर प्रणाली यांचा वापर करून अन्न वर नेले जात असे, त्यामुळे किल्ला म्हणजे फक्त दगडी बांधकाम नव्हता तर पूर्ण जीवंत शहर, जिथं शासन, सेना, प्रजा आणि व्यवस्था एकत्र श्वास घेत असे आणि म्हणूनच शिवरायांचे किल्ले आजही सांगतात अन्नसाठा म्हणजेच अजेयत्व.. जय भवानी जय शिवराय! 🚩
![]()

