रविवार विशेष – कोरलई किल्ला : समुद्रावर उभा असलेला ५०० वर्षांचा लोखंडी प्रहरी..

       रविवार विशेष 

छावा डिजिटल न्यूज पोर्टल ––सचिन मयेकर—रविवार 30 नोव्हेंबर २०२५

रेवदंड्यापासून अवघ्या काही किलोमीटरवर, पुल ओलांडून कोरलई गावाच्या डोंगररांगांमध्ये एक गड शांतपणे उभा आहे. पर्यटनाच्या नकाशांवर फारसा चमकत नाही, स्थानिकांच्या आठवणीत नाव थोडंसं बदलून ‘कोरले किल्ला’ म्हणून ओळखला जातो… पण इतिहासाच्या पानांमध्ये त्याचं खरं नाव आहे “CASTELO DE KORLAI”, म्हणजेच कोरलई किल्ला.आज ज्या टेकाडावर उभा राहू आणि खाडीकडे नजर टाकू.

त्याच ठिकाणी पाचशे वर्षांपूर्वी पोर्तुगीजांची तोफा समुद्रावर डोळा ठेवून उभ्या होत्या.कोरलई किल्ल्याचा जन्म १५२१ ते १५२६ रेवदंडा जिंकण्यासाठी उभारलेला लोखंडी पहारेकरी.पोर्तुगीजांनी १५२६ मध्ये रेवदंड्यात पाऊल ठेवले. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर असलेलं रेवदंडा हे त्यांच्यासाठी सोनेरी ठिकाण होतं बंदर, व्यापार, आणि समुद्रातून येणारी संपत्ती.या सर्वाचं रक्षण करण्यासाठी त्यांनी समुद्रकाठावर भव्य रेवदंडा भागात किल्ला उभा केला तोच आगरकोट किल्ला.पण तेवढ्यावर त्यांची रक्षा पूर्ण होत नव्हती. समुद्राच्या बाजूने हल्ला झाला तर तोफा चालतील, पण जमिनीमार्गे येणारा शत्रू नेमकं कोरलई टेकाडी वापरूनच खाली उतरायचा.मग बांधण्यात आला हा किल्ला टेकडीवरचा प्रहरी, संपूर्ण खाडीवर नजर ठेवणारा “Out-Guard Fort”.हेच नंतर स्थानिकांच्या तोंडी “कोरले / कोरलई किल्ला” झालं.खाडीवरून चालणारी पहारेकऱ्यांची नजर  ३६०° दृष्टीक्षेप.कोरलईच्या टेकडीवर उभं राहिलं की चारही बाजूचं दृश्य आजही अंगावर काटा आणतं.

एकीकडे अथांग अरबी समुद्र.दुसरीकडे रेवदंडा-चौलचे बंदर डावीकडे म्हसळ्याकडे जाणारा मार्ग, खाली चमकणारी रेवदंडा खाडी आणि मागे उभे असलेले कोकणातील हिरवे डोंगर या सर्वावर नजर ठेवणारा कोरलई किल्ला म्हणजे पोर्तुगीजांच्या साम्राज्याचा रडार स्टेशनच होतं. रात्री शत्रू दिसल्यावर आग, धूर सिग्नल देण्यासाठी इथे खास प्लॅटफॉर्म होता. खाडीवर जहाज हलले तरी इथल्या पहारेकऱ्यांना लक्षात यायचं.शिवाजी महाराजांच्या काळात कोरलई  गुप्त मार्ग, पहारे आणि मोहीमांची चाहूल शिवाजी महाराजांच्या स्वराज्य विस्ताराच्या काळात रेवदंडा–चौल हे अत्यंत महत्वाचे होते. थेट लिखित पुरावा जरी कमी असला तरी स्थानिक इतिहास, कोळी समाजाचा तोंडी पुरावा आणि काही ब्रिटिश दस्तऐवज सांगतात की स्वराज्याच्या गुप्तहेरांनी कोरलई टेकडिमधून रेवदंड्याकडे लक्ष ठेवण्याची योजना वापरली किल्ल्याच्या मागच्या बाजूने गुप्त मार्ग होते पोर्तुगीजांच्या हलचाली, जहाजे, मालाची आवक-जावक—सगळं डोंगरावरून दिसायचं म्हणजे हा गड फक्त पोर्तुगीजांच्याच हातात नव्हता… त्याच्या डोळ्यांतून स्वराज्यानेही समुद्र पाहिलाच आहे. इंग्रज आले… आणि कोरलईच्या माथ्यावर उजेड पेटला १८१८ नंतर कोकणावर इंग्रजांचा ताबा झाला. सैनिकी संरक्षणाचा उपयोग संपला, पण समुद्रावरून येणाऱ्या जहाजांसाठी कोरलईची टेकडी एकदम योग्य ठिकाण होती. १८६७–१८७२ च्या दरम्यान इथे बसवण्यात आलं नेव्हिगेशन Beacon Light  आजचं कोरलई लाइट हाऊस. हा प्रकाश मच्छीमारांना दिशा दाखवतो,धुक्यात जहाजांना मार्ग देतो,आणि समुद्राच्या काळोखात खाडीची ओळख पटवतो.आजही सूर्यास्ताच्या वेळी लाइट हाऊसचं दृश्य पर्यटकांना वेड लावतं. कोरलई किल्ल्याची रचना  ७ दरवाजे, दगडी तटबंदी आणि विशाल भिंती कोरलई किल्ला पूर्णपणे दगडात घडवलेला आहे.याची मोठी वैशिष्ट्ये ७ दरवाजे (पोर्तुगीज शैलीतील परकोट), भारी दगडी भिंती समुद्राकडे झुकलेले तटबंदी बॅस्टियन वर तोफा ठेवण्याचे उंच प्लॅटफॉर्म पहारेकऱ्यांचे छोटे कक्ष व खोल्या या किल्ल्याला “Morro de Chaul” म्हणजे चौलचा डोंगर किल्ला असंही म्हटलं जात होतं. आधुनिक कोरलई  मुलांसाठी उद्यान, फोटो पॉईंट आणि शांत पर्यटन स्पॉट आज कोरलई किल्ला हा अवशेषरूपात असला तरी शांतपणे निसर्गाचा आनंद घेण्यासाठी एकदम परफेक्ट जागा आहे. खाली छोटं पण सुंदर बाल उद्यान आहे, सकाळ-संध्याकाळ जॉगिंग-फोटो पॉईंट, रेवदंडा–कोरलई खाडीचं मनमोहक दृश्य, पर्यटकांची लगबग, लाइटहाऊसवर रोमँटिक सूर्यास्त, कोल्हापूर, पुणे, मुंबई, मुरबाड सगळीकडून पर्यटक इथे येतात. पण तरीही हा ठिकाणाचं सौंदर्य कायम शांत आणि अस्पर्शित वाटतं. ५०० वर्षांचा प्रहरी आजही शांत उभा… पण इतिहासाचा आवाज तुमच्या कानात घुमतो.कोरलई किल्ला म्हणजे दगडांचा ढिगारा नव्हे.तो आहे समुद्रावर नजर ठेवणारा ५०० वर्षांचा साक्षीदार पोर्तुगीजांच्या साम्राज्याची सीमेवरची तलवार स्वराज्याच्या गुप्त नजरांची टेकडी .इंग्रजांच्या Beacon Light चा घर आणि आजच्या पिढीसाठी निसर्गाच्या मांडीवर विसावलेलं शांत पर्यटनस्थळ. समुद्रानं लिहिलेल्या आठवणी… आणि डोंगरावरती अजूनही वाहणारा तीव्र इतिहासाचा वारा…हेच आहे. कोरलई किल्ल्याचं खरं साम्राज्य पर्यटकांसाठी सोयी  फक्त १० रुपये तिकीट, लाइटहाऊसवर चढण्याची संधी कोरलई किल्ल्याच्या पायथ्याशी आज पर्यटन व्यवस्थापन साधेपणाने पण नीट केलेले आहे. इथं येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला फक्त १० रुपये इतकं नाममात्र शुल्क देऊन प्रवेश मिळतो. आणि एवढ्यातच सर्वांत मोठी आकर्षक गोष्ट मिळते

 दीपस्तंभ (लाइटहाऊस) वर चढण्याची परवानगी

उंच लोखंडी पायर्‍या चढून जेव्हा वर पोहोचतो, तेव्हा खाली रेवदंडा खाडी, कोरलई गाव, आणि समुद्राचा अथांग निळा पसारा असा एक अप्रतिम दृश्यपट डोळ्यांना दिसतो. थोडक्यात १० रुपयांत मिळणारं कोकणातील सर्वात सुंदर दृश्य. पायऱ्या चढून जाणारा गड  जीर्ण पण जिवंत इतिहास किल्ल्याच्या टेकडीवर जाण्यासाठी बनवलेल्या पायर्‍या आणि दगडी चढण आजही आहेत.थोड्या जीर्ण झालेल्या, काही ठिकाणी मोडकळीस आलेल्या, तरीही त्या पायऱ्यांवरून चालताना जाणवतं याच मार्गावरून पोर्तुगीज पहारेकरी फिरले असतील,
याच पायऱ्यांवरून स्वराज्याचे धाडसी गुप्तहेर आले असतील      किल्ल्याकडे जाणारी चढाई मोठी, कडक आणि दमछाक करणारी.कोरलई किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठीची चढाई मोठी आहे, सोपी अजिबात नाही.टेकडीवर जाणाऱ्या पायऱ्या उंच-खोल आहेत, काही ठिकाणी मोडकळीस आलेल्या आणि बराचसा मार्ग तिरका व चढणारा आहे.पहिल्या १५–२० मिनिटांतच दम काढायला लावणारी ही चढाईनक्कीच फक्त साधी सैर नाही हा एक छोटासा अॅडव्हेंचर ट्रेकच आहे.शांतपणे चालत गेलं तर दीड तास पुरेसे आहेत. किल्ल्याचे अवशेष, तटबंदी, बॅस्टियन, लाइटहाऊस आणि समुद्रदृश्य हे सर्व बघण्यासाठी.

खाली मुलांसाठी खेळण्याची बाग कुटुंबांसाठी परफेक्ट ठिकाण किल्ल्याच्या पायथ्याशी आज बालउद्यान तयार केलं आहे.रंगीत घसरणी,सी-सॉ,झोके,व छोटंसं खेळण्याचं मैदान म्हणजे पर्यटक वर किल्ल्यावर चढत असताना मुलं खाली खेळू शकतात,आणि कुटुंबांसाठी हे ठिकाण आणखी सोयीचं बनतं.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *