रविवार विशेष | इतिहास साक्षीचा पन्हाळा किल्ला शिवराय आणि छावा जिथे इतिहास प्रत्यक्ष घडला
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍️ सचिन मयेकर 📅 रविवार ,२१ डिसेंबर २०२५
महाराष्ट्राच्या इतिहासात काही किल्ले केवळ दगड-मातीचे नसून जिवंत इतिहास आहेत. त्यात अग्रभागी उभा आहे पन्हाळा किल्ला.हा किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धाडसाचा आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचा साक्षीदार….
पन्हाळा का आहे तो इतका महत्त्वाचा?
कोल्हापूर जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेला पन्हाळा किल्ला, दख्खनवर लक्ष ठेवणारा रणनीतीचा केंद्रबिंदू होता. व्यापारमार्ग, घाटवाटा आणि लष्करी हालचालींवर नजर ठेवण्यासाठी हा किल्ला अत्यंत उपयुक्त.
शिवरायांचा पन्हाळा : धाडस, योजना आणि इतिहास
सन १६६०… आदिलशाही सरदार सिद्दी जोहर याने पन्हाळ्याला वेढा दिला.किल्ल्यात अडकलेले शिवाजी महाराज पण हार न मानणारे! पावनखिंड (घोडखिंड) पराक्रम रात्रीच्या अंधारात शिवरायांनी पन्हाळा सोडला.बाजी प्रभू देशपांडे यांच्या बलिदानामुळे हा इतिहास अजरामर झाला.पन्हाळा म्हणजे रणनिती, धैर्य आणि स्वराज्याची शपथ….
संभाजी महाराज आणि पन्हाळा : वारशातून आलेले शौर्य
पन्हाळा हा केवळ शिवरायांचा नव्हे, तर संभाजी महाराजांचा किल्लाही आहे.बालपणापासूनच या किल्ल्यावर त्यांनी राजकारण, युद्धकला आणि प्रशासनाचे धडे घेतले. संभाजी महाराजांच्या काळात पन्हाळा म्हणजे मराठ्यांच्या प्रतिकारशक्तीचे केंद्र मुघल सत्तेविरोधातील धगधगती ज्वाला छाव्याचा आत्मविश्वास.
किल्ल्यावरील ऐतिहासिक स्थळे
सज्जा कोठी, शिवरायांचे वास्तव्य, तीन दरवाजा, प्रवेशद्वारांचा किल्लेबंदी चमत्कार, अंबरखाना, धान्यसाठ्याची दूरदृष्टी कलावंती बुरुज परिसर युद्धनजरेचा सर्वोच्च बिंदू
✍️ रविवार विशेष निष्कर्ष
पन्हाळा किल्ला म्हणजे केवळ भूतकाळ नाही,तो आहे शिवरायांचे धाडस आणि संभाजी महाराजांचा स्वाभिमान जपणारा जिवंत साक्षीदार. आजही पन्हाळ्याच्या वाऱ्यात स्वराज्याची शपथ ऐकू येते… छाव्याचा आवाज घुमतो… आणि इतिहास जिवंत होतो!
![]()

