रघुकुळ रीत सदा चली आयी, प्राण जाये पर वचन न जायी!” श्री राम जन्मलें … आणि मानवतेला दिशा मिळाली

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर, रेवदंडा गुरुवार २६ मार्च २०२६

चैत्र शुद्ध नवमी  हा दिवस केवळ एका देवतेचा जन्मदिवस नाही, तर तो आहे धर्म, सत्य, कर्तव्य आणि मर्यादेचा अवतार पृथ्वीवर अवतरला त्या क्षणाचा उत्सव! अयोध्येच्या पवित्र भूमीत राजा दशरथ यांच्या घरी जेव्हा श्रीरामाचा जन्म झाला, तेव्हा तो फक्त एक राजकुमार नव्हता  तो होता एक आदर्श पुत्र, आदर्श राजा, आदर्श पती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आदर्श मानव!
आजच्या काळात, जिथे स्वार्थ, फसवणूक आणि अधर्म यांचा अंधार वाढताना दिसतो, तिथे श्रीरामाचा जीवनप्रवास आपल्याला शिकवतो 
👉 “परिस्थिती काहीही असो, पण धर्माचा मार्ग सोडू नका!”
वनवास असो, सीतेचा विरह असो, किंवा रावणासारख्या बलाढ्य शत्रूशी सामना  श्रीरामाने प्रत्येक वेळी संयम, शौर्य आणि नीती यांचा मार्ग निवडला.
“रामायणात सर्वाधिक गैरसमज झालेली व्यक्ती म्हणजे कैकयी… पण खरं सत्य मन हेलावून टाकणारं आहे!”
कैकयी ही श्रीरामांची शत्रू नव्हती, उलट तिचं रामावर अफाट प्रेम होतं. लहानपणी राम आणि कैकयी एकमेकांशिवाय झोपतही नसत, इतकं ममत्व तिच्या मनात होतं. पण जेव्हा काळाने कठोर वळण घेतलं, तेव्हा हाच प्रेमळ हृदय असलेली आई संपूर्ण जगाच्या नजरेत “दोषी” ठरली. रामाला वनवास देण्याचा निर्णय तिचा स्वार्थ नव्हता, तर तो होता धर्म आणि कर्तव्य जपण्यासाठी स्वतःच्या भावना गिळून टाकण्याचा त्याग!
“रामायणातील हा एक अतिशय गूढ आणि विचार करायला लावणारा पैलू आहे…”
रावण हा केवळ एक राजा नव्हता, तर तो असा क्रूर राक्षस होता ज्याने हजारो देवतांना बंदी बनवलं होतं आणि संपूर्ण सृष्टीवर अन्यायाचं सावट निर्माण केलं होतं. अशा अधर्मी शक्तीचा अंत करणे हे एक महान कार्य होतं  आणि ते फक्त राजगादीवर बसून शक्य नव्हतं. त्यासाठी आवश्यक होती वनातील यात्रा, संघर्ष आणि योग्य वेळ!
👉 काही कथांनुसार, श्रीरामांनीच कैकयीला समजावले की  “माते, जर तू माझ्या पाठीशी उभी राहिलीस, तरच मला हा राजसिंहासन सोडून बाहेर पडता येईल… अन्यथा मला कोणीही जाऊ देणार नाही.” रामाच्या या ध्येयामागे संपूर्ण मानवजातीचं कल्याण दडलं होतं.
रामावरील अतूट प्रेम असूनही, कैकयीने स्वतःच्या मनावर दगड ठेवला आणि दशरथांकडे दोन वर मागितले  भरताला राज्य आणि रामाला वनवास. त्या क्षणी ती आई नव्हती, तर ती होती एक त्यागमूर्ती, जी आपल्या प्रिय रामाच्या ध्येयासाठी स्वतःवर कायमचा कलंक घेण्यास तयार झाली.
रघुकुळ रीत सदा चली आयी, प्राण जाये पर वचन न जायी!
ही ओळ फक्त रामायणातील वाक्य नाही, तर ती आहे संस्कार, निष्ठा आणि कर्तव्याची अखंड परंपरा! रघुवंशाची ही परंपरा सांगते  माणूस प्राण गमावू शकतो, पण दिलेलं वचन कधीच मोडत नाही.
श्रीरामांनीही याच परंपरेचा मान राखत, वडिलांनी दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी क्षणाचाही विलंब न करता राजसिंहासनाचा त्याग केला आणि १४ वर्षांचा वनवास स्वीकारला. त्या एका निर्णयात त्याग होता, वेदना होत्या, पण सर्वात मोठं होतं ते  वचनाचं पालन!
आज आपण रामाला फक्त मंदिरात पूजतो, पण खऱ्या अर्थाने राम आपल्या आचरणात उतरवतो का?
👉 हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे!
रामराज्य म्हणजे फक्त एक सुवर्णकाळ नव्हे, तर ती एक व्यवस्था होती  जिथे न्याय होता, समानता होती आणि जनतेचा आवाज सर्वात महत्त्वाचा होता.
आजच्या समाजात जर खरंच बदल हवा असेल, तर प्रत्येकाने आपल्या मनात एक “राम” जागवला पाहिजे.
कारण 
राम मंदिरात नाही… तो आपल्या विचारात, वागण्यात आणि निर्णयात असतो!
“प्राण जाई पर वचन न जायी  हाच खरा राम जन्मोत्सव!”

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *