मुंबई हादरली ३४ मानवी बॉम्ब पेरल्याची धमकी; नोएडातून आरोपीला पकडले

मुंबईकरांना हादरवणारी ही धमकी पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईने फोल ठरली.

मुंबईला हादरवायचं स्वप्न पाहणाऱ्यांचे डाव पुन्हा एकदा कोलमडले

गणेशोत्सवाच्या शेवटच्या टप्प्यावर, अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला मुंबईला रक्तरंजित करण्याची धमकी देत एका विकृत डोक्याने मुंबई पोलिसांच्या व्हॉट्सॲप नंबरवर संदेश टाकला.

मुंबई ६ सप्टेंबर (PTI) २०२५

मुंबईत ३४ गाड्यांमध्ये मानवी बॉम्ब ठेवले आहेत… तब्बल ४०० किलो आरडीएक्सनं संपूर्ण शहर हादरणार आहे… आणि एक कोटी लोकांचा बळी जाणार.

अशा थरकाप उडवणाऱ्या संदेशाने एकच खळबळ उडाली.

धमकी मिळताच मुंबई पोलिसांनी तात्काळ सुरक्षा यंत्रणा फुल कॉम्बॅट मोडमध्ये आणली. शहरात नाकाबंदी, वाहन तपासणी, संशयितांवर लक्ष – संपूर्ण मुंबई सावधान!

या भयानक संदेशामागे दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा दावा करण्यात आला.

परंतु पोलिसांच्या अचूक चपळाईने हा खेळ उधळला.

आरोपीचे नाव अश्विनी

मूळ : बिहार

वास्तव : नोएडा, गेली ५ वर्षं

स्वतःला कधी ज्योतिषी, तर कधी जिहादी संघटनेचा सदस्य असल्याचा दावा!

नोएडा सेक्टर-११३ मध्ये आरोपीला मुसक्या आवळल्या.

त्याच्याकडून एक मोबाईल जप्त.

पोलिसांनी लगेचच संपूर्ण शहरात सुरक्षा यंत्रणा वाढवली –

महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

संशयास्पद वाहनांची तपासणी

पोलिसांचा सतत गस्त

नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन

मुंबईत आधीच गणेश विसर्जनाची गर्दी – आणि त्याच वेळी अशी धमकी… वातावरणात तणाव चहूकडे जाणवत होता. पण विघ्नहर्त्याने संकट दूर सारत उत्सवाला गोड शेवट दिला.

पोलिसांचा इशारा :

कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा व्यक्ती दिसल्यास लगेच पोलिसांना माहिती द्या. अफवांवर विश्वास ठेवू नका.

 

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *